उन्हाळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे आंबे आणि आंब्याच झाड ,घरी यायचं ते फक्त कुणी हाक मारल्यावर ती फांदी तुझी ही माझी,ती दादाची नकळत वाटणी ही करु बसलो होतो पण आज मात्र झाड एकाकी होवुन वाट बघत उभे आहे.
ताईच लग्न मग दादा पण कामावर परत चार वर्षांनी सगळे पाखरं उडुन गेली आधी दोन रुम मध्ये सात जण होती आणि आता पाच रुम मध्ये तीन जण, मनात खुप काही असुनही कुणाला थांब म्हणता नाही येत, जो तो ज्याच्या त्याच्या सवडीने येतो आणि जातो, मला आठवत दोन वर्षांपूर्वी मोठ्या दादाचं लग्न झाले आणि पंधरा दिवसांनी तो ड्युटी वर निघुन गेला, त्या नंतर वहीनी ही जाणार होत्या तेही त्यांच्या सर्व सामान सह त्या नव्या ठिकाणी जाणार, या साठी उत्सुक आवराआवर चालली , गाडी ही सामान भरण्यासाठी आली,हे घेऊन जाते पडेल ते घेऊन जा , वडील ही हातभार लावत,पण त्यांच मन मात्र त्यांना च माहित,मग नंतर रिकामं घर बघुन सगळ्यांचे डोळे डबडबुन आले ,आता आपला मुलगा लवकर घरी नाही येणार त्याला नवं घर झाल ह्याचा विचार करतच आई रडत होती आजी ही पण खरंच नंतर मात्र भेट ही सहा महिन्यांनी च होवु लागली. कधी कोणी मन दुखावले तर सगळ्यांचीच आठवण येते बहीण भाऊ लांब झाले दुःख ही सांगता येत नाही कुणाला.पण जगासमोर प्रगत आहे सगळे .