Bluepad | Bluepad
Bluepad
निरोप
Balaji G Dhote
Balaji G Dhote
23rd Jun, 2022

Share

पुन्हा दु:खा तुझ्याकडे मला यावेच लागले
सुखाने छळले होते मला असे दिन रात
पुन्हा एकांताला आपले करावे लागले
गनगोतानी खंजिर खुपसला होता काळजात
माझे,माझे म्हणून करत आलो आजवर
लाथाडले त्यांनी मला त्यांच्याच अंगनात
उन्हांशी यारी करावी लागली जळता जळता
सावल्या डसल्या होत्या सांजवेळी अंधारात
घन व्याकूळ होवून मला रडावे लागले
उपाशीपोटी हसत होतो मी असाच आनंदात
तुझ्या मैञिला मला तोडावेच लागले
किंतमच राहिली नव्हती येणाऱ्या दिवसात

185 

Share


Balaji G Dhote
Written by
Balaji G Dhote

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad