।। उंच भरारी ।।
मुलांना मोठं करताना
जीवन पुर्ण वाहिलं
कष्टचं करत राहिले
वळुन नाही पाहिलं ।।
पंख फुटले पाखरांना
जग सारं दाखवलं
फिरून येतील माघारी
जगायला ही शिकवलं ।।
उंच भरारी घेताना
घरं प्रेमाच उभारलं
उडून गेली पाखरं
मन वाट पहात राहिलं ।।
आई-बापाला एवढं
हतबल नाही पाहिलं
आयुष्यच जेव्हा त्यांचं
थोडच होतं राहिलं ।।
संभाजी रामकृष्ण गोरे...✍🏻