Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग - कुंकू आणि मंगळसूत्र
वंदना गवाणकर
23rd Jun, 2022

Share

मला एकांनी ह्या विषयावर लिही म्हणून सुचवलं... खरं तर हा विषय प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे... त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे त्यावर....
लहानपणापासून आपल्याला कुंकू लावायची सवय लागते... आईला बघून... तेव्हा सिंदूर च्या वेगवेगळ्या रंगाच्या गंधाचा एक गोल डब्बा मिळायचा त्यात अगदी सफेद रंगाचं पण कुंकू असायचं... मी खुप जपून वापरायची ते. गंध सुकल की त्यात थोडं पाणी घालून ढवळायच मग परत वापरायला मोकळे. मग टिकल्या आल्या.. असं वापरता मोठं झालो आणि कळलं की कुंकू नाही लावले तर आपण थोडे मॉडर्न आहोत असं वाटतं.. कारण माझ्या मैत्रिणी इंग्लिश मीडियम च्या त्यांना कुंकु नाही लावलं तरी शाळेत चालत होतं.. मग मी कॉलेज ला पाऊल टाकलं आणि कधीतरी टिकली लावली तर... स्कर्ट आणि शर्ट पॅन्ट घातली की टिकली नाही लावायची एवढं कळायला लागलं... अर्थात माझा मोठा भाऊ सोडून कोणी माझ्या टिकली न लावण्यावर कधी हरकत घेतली नाही. तो आला की त्याच्या बेलचा आवाज ऐकून मी टिकली लावायची... उगाचच भांडण नकॊ. (मी खुप शांत स्वभावाची होती ना ).
लग्न झाल्यावर कुंकू लावायचंच आणि एक मंगळसूत्र हा दागिना add झाला.. वेगवेगळ्या प्रकारच मंगळसूत्र घालायला लागले...पण मी म्हटलं ना हे सर्व करायला मनापासून वाटलं पाहिजे... जबरदस्ती नकॊ.... कुंकू आणि मंगळसूत्र नाही घातलं तर बाई बदचलन ठरते का? मग पुरुषांच काय ते तर साखरपुड्याला घातलेली अंगठी पण 'होतं नाही' ह्या सबबीवर थोडया दिवसांनी काढून ठेवतात तेव्हा आम्ही संशय घेतो का? ह्याच कुठेतरी लफड बाहेर म्हणून... मग बाई वर ही बंधन का? नाही वाटतं तिला कुंकू लावावंसं.. कधीतरी बदल म्हणून तिने मंगळसूत्र काढून एखादा मॅचिंग सेट घातला, नाहीतर नुसती चेन घातली, काय बिघडलं??? ही बंधन बायकांवर का? कुठला पुरुष लग्न झालं हे दाखवायला काय करतो?
आताच्या आता मी दोन तीन उदाहरणं बघितली की सांभाळता येतं नाही आणि आवड नाही म्हणून मंगळसूत्र फक्त सणाला घालतात बऱ्याच लग्न झालेल्या मुली... चालतं ना यार ... त्यांच्या नवऱ्यांनाच ते घातलेलं आवडत नाही.. कदाचित असं म्हणावं लागेल की ही पिढी आपल्या पिढी पेक्षा समंजस आहे.. त्यांचा आपल्या बायकोवर जास्त विश्वास आहे.. ती समाजात वावरताना हा विश्वास घेऊन पुढे जातेय... कुठल्याही बंधनापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा वाटतो... कदाचित मागच्या पिढीला हे जमलं नाही...ती अजूनही जुन्या चालीरिती ज्या फक्त बायकांसाठीच बनवल्या आहेत त्या बाळगण्यात धन्यता मानते...
विधवा स्त्रीला कुंकू लावायचं नाही..मंगळसूत्र नाही...असं एक नियम ह्या समाजात आहे... का बाबा? ती लहानपणापासून कुंकू लावतेय तिचा हक्क नवरा गेल्यामुळे काढून घायचा??? ती बाई विधवा बाहेर हे कळावं आणि मग तिला छळायला हे कावळे मोकळे???? कोणी केले असे नियम? नक्कीच कुठल्या तरी पुरुषानेच ना??? बाई म्हणजे सालस, सोज्वळ, सगळी बंधन पाळणारी बाहुली.... हेच लादलय आतापर्यंत.... तीच अस्तित्व कुंकू आणि मंगळसूत्रांत नका बांधून ठेऊ.... एवढीच विनंती. तिच्यावर विश्वास ठेवा आणि दाखवा.
🙏 वंदना ❤

235 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad