Bluepad | Bluepad
Bluepad
हा लेख माझा नाही
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
22nd Jun, 2022

Share

*हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?*
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे.
तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे ? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ?
कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे. तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध/तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत ?
तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात मुस्लिमांची चूक कुठे आहे ?
आमच्या समाजात लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते आणि इबादत/नमाज हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते... तुम्ही लोकांनी मंदिरे पाहणेही सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेव्हा स्वतःला देवाकडून काही हवे असते किंवा दुःखात असतील तेव्हाच देवळात जातात. आता जर तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहित नसेल, मंदिरात काय करावे माहित नसेल, पूजा हे कर्तव्य आहे हे ही माहिती नसेल, तर ह्यात मुस्लिमांचा दोष आहे का ?
तुमची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकांचे पठण केल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्याने गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दु:खही वाटत नाही !
घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना "सलाम" म्हणायला शिकवतो. पण तुमची नमस्कार आणि प्रणाम करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला जबाबदार कोण ?
कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू, अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात. तुमची मुले रामायण किंवा गीता वाचत नाहीत. त्याला संस्कृत येत नाही, आणि ब-याचदा मातृभाषाही येत नाही. हा आमचा दोष आहे का ?
तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व काही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला. मात्र आम्ही त्यांना विसरलो नाही. आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत आणि कधीच सोडणार नाही.
तुम्ही स्वतः तिलक, भस्म, यज्ञोपवित घालणे टाळता, शिखा ठेवणे टाळता. तुमच्या स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता. या पद्धतींची ओळख दाखवायलाही तुम्हाला लाज वाटते.
आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला मागासलेपणाचे समजत आहात. याला मुस्लिम जबाबदार कसे ?
तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात.
तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत याचा विचार करा. आम्ही कारणीभूत आहोत का ?
खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजातील कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात आमचा दोष आहे का ?
आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो.
अनेक दशकांपासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात. पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख आम्ही आजही कायम ठेवली आहे.
जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका आमच्यावर का ठेवता ?
याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.
आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.
🙏🚩🛕🌷👏

181 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad