Bluepad | Bluepad
Bluepad
पुरामुळे काय होईल यापेक्षा काय होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा.
कु. रुपाली घेरडे
कु. रुपाली घेरडे
22nd Jun, 2022

Share

पाऊस तर सगळ्यांना आवडतो पण त्याच पावसाच अतिपर्जन्य झालं तर त्याहून जास्त धोक्याच पण ह्यात पडणाऱ्या त्या पावसाची काय चूक?
आपल्यालाच मोठमोठ्या इमारती हव्या आहेत, मोठ्या गाडीतून फिरायच आहे use and throw च्या विचाराने आपण अमाप प्लॅस्टिकचा वापर करतोय,आपल्या अश्या वागण्यामुळे वातावरणावर परिणाम होतोय प्रदूषणासोबत आपण आपलंच जीवनचक्र दूषित करतोय हेच आपल्याला कळतं नाही. पुरामुळे असंख्यांच आयुष्य दूषित होतंय, कित्येकांचा संसार उध्वस्त झाला,ह्या सगळ्यात सगळं काही वाहून गेल,सगळीकडे सगळेजण धावत होते फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथे विचार नव्हता मोठ्या इमारतींचा,मोठ्या गाड्यांचा तिथे फक्त जीव महत्त्वाचा वाटत होता. हजारो झाड तोडल्यानंतर आपण एखाद्या दिवशी कुठेतरी एखाद झाड लावतो म्हणजे आपल्याला वाटत आपण पर्यावरणाला वाचवतोय अस करून आपण पुढे येणाऱ्या आपल्या भविष्याकडे दुर्लक्ष करतोय हेच आपल्याला कळत नाही. म्हणून इथे आज एकही व्यक्ती निरोगी बघायला मिळत नाही प्रत्येकाला काही न काही आजार आणि आजाराची लक्षणे जाणवतातच, आपल्याला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करता पर्यावरण चांगलं राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, प्लास्टिक बंदी आशा पर्यावरण चांगलं राहण्यासाठी योजना काढल्या पाहिजेत. सरकार करेल,हा करेल,तो करेल यापेक्षा स्वतःच पहिलं पाऊल उचलायला हवं.
पुरामुळे काय होईल यापेक्षा काय होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा.

215 

Share


कु. रुपाली घेरडे
Written by
कु. रुपाली घेरडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad