खरच ही नाती अतूट असतात का….?
जाताना म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर……
मी खरच तुला विसरू शकेन का ?
आज मारतो आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी
खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का?
अश्या अनेक कविता…
आज धूळ खात पडल्या आहेत……
तुझ्याचसाठी लिहिलेल्या………..
कदाचित तू त्या वाचल्या असशील…………
कदाचित नसशीलही………