Bluepad | Bluepad
Bluepad
निसर्गाचं बंड.
Pooja Tulshibagwale
Pooja Tulshibagwale
22nd Jun, 2022

Share

उन्हाने होणारी जीवाची काहीली शमविण्यासाठी आपणं सारे चातकासारखी पावसाची वाट पहात असतो.अश्या या बहु प्रतिक्षित पावसाच्या आगमनाने साऱ्या सृष्टीस नवचैतन्य प्राप्त होत.शेतीच्या कामांना नवीन उत्साह येतो.आणि उद्याची काळजी करणारा मानव सुखावतो.कारण पाणी हे आपल्या साठी जीवन आहे.मानवी शरीरात धमन्या द्वारे अविरत वाहणाऱ रक्त जस शरीराला सचेत ठेवत तसच पावसाचं पाणी वाहून नेणाऱ्या नद्या आपल्या तिरांना समृध्द करत सर्व जीवांसाठी वरदान ठरतात.
पणं जेव्हा जीवन देणारा हाच पाऊस बेबंद कोसळतो तेव्हा नद्या,नाले तुडुंब भरून वेगाने वाहू लागतात.आणि जलाषयांनी धोक्याची पातळी ओलांडली की मनात धडकी भरते.पाण्याचे दिशाहीन लोंढे आपले तटबंध तोडून अक्राळ विक्राळ रूप धारण करून वाटेत येयील ते गीळंकृत करत जातात.आणि जीवनदायिनीच जीवावर उठते.क्षणात होत्याचं नव्हतं होत.या साऱ्यात प्रत्येक वेळी लहरी निसर्ग किंवा ईश्वर,आणि नशीब याच गोष्टी कारणीभूत असतात असे नाही. महाराष्ट्रात मुंबई ला काही वर्षांपूर्वी 26 जूलै रोजी आलेला महापूर अर्धाअधिक आपणं स्वतः वर ओढवून घेतलेला होता.सगळीकडून अनिश्चित झालेल्या जगण्यात हे पुराचे संकट भर टाकणारे होते. सात बेटांमध्ये भराव घालून आधीच सुमुट्र मातीने बुजवलेला,त्यात अनंत उद्देशांनी मुंबईत दाखल होणारे माणसांचे लोंढे,त्यात बहुउद्देशीय राजकारण्यांनी फुगत जाणाऱ्या वसत्यांकडे जाणून बुजून केलेला कानाडोळा,समुद्रावर पडत जाणारे वाढते भराव , प्लॅस्टिक पिशव्यांनी तुंबलेली गटारं,अशी कितीतरी कारण पावसाच्या मदतीला आली आणि एरवीही तुंबणारी मुंबई त्या बेसावध क्षणी पूर्ण पाण्यात बुडून गेली. मलमत्ते बरोबरच कितीतरी जीव हकनाक बळी पडले.
अशीच हालत दोन तीन वर्षांपूर्वी पुण्यातील काही लोकांची झाली आंबील ओढ्याच्या भिंती खचल्यामुळे अचानक पाण्याचे लोंढे येवून रस्त्यावरचे चालत जाणारे लोकं, वहना वरून जाणारी माणसं पहाता पहाता वाहुनगेली. सोसाटयामध्ये पार्किंग मध्ये, घरांमध्ये पाणी घुसून पडझड झाली.काही जण दुसऱ्यांना वाचवताना वाहून गेले. डोळ्यादेखत संसाराची स्वप्न वाहून गेली.इथेही देखभाली अभावी नाल्याची कललेली भिंत,नाल्यात टाकला जाणारा कचरा,धोकादायक पद्धतीने नाल्याकाठी निर्माण झालेल्या वसाहती.असे सर्व घटक कारणीभूत होते.
या व्यतिरिक्त पर्जन्याचे बदललेले स्वरूप,सिमेंटच्या रस्त्यांमुळे पणी जमिनीत न जीरण आणि त्यामुळे रस्त्यावर पणी साठत जाण. डोंगर फोडल्याने, झाडांची कत्तल झाल्याने पावसात माती वाहून गेल्याने सर्वत्र गाळ साचण,या साऱ्याचे पर्यवसन पुरात होते.नगर रचनेचा असा बोजवारा उडालाय की एखाद्या अमीबासारखाच शहर आकारहिन झालाय.वेळीच शासन आणि सामान्य जनतेने एकत्र येवून असे प्रश्न सोडवायला पाहिजेत.
पूर परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापन चोख कामगिरी बजावत,पणं अशी कायमस्वरूपी व्यवस्था असायला हवी जी कुठ्ल्याही संकटं काळी तत्पर असेल.
नागरिक म्हणून प्रत्येक प्रकारचा कचरा वेगवेगळा ठेवावा.प्रवासात कुठेही कचरा फेकू नये.शासनाच्या मागे लागून पावसाळी गटारांची स्वच्छता करून घ्यावी.निसर्गाला हानिकारक असणारे वर्तन शक्यतो टाळावं.बाकी सारे राम भरोसे..
बरसून असा गेला पाऊस,
नेले वाहून सारे घरदार!
प्याऱ्या जीवाची घेऊन जोखीम
पेलला डोईवर उरला सुरला संसार!
पाण्याने गाठले असे कोंडीत
न दिसे कुठे आता आसरा दूरवर!
कुणी कुणाचे करावे सांत्वन ?
डोळ्यांतले अटले पाणी,मनात दाटला पूर!
पूजा तुळशीबागवाले.

246 

Share


Pooja Tulshibagwale
Written by
Pooja Tulshibagwale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad