Bluepad | Bluepad
Bluepad
तुमचा स्वभाव___होंठा वरुन
Sangeeta
Sangeeta
22nd Jun, 2022

Share

शरीरातील प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व असतं.
ओठ हे केवळ सौंदर्याचं प्रतीक नसतं तर ओठांवरून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी देखील समजू शकते. पुरुष आणि स्त्रिया यांच्या ओठांवरून तुम्ही त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकता. सामुद्रिक शास्त्रामध्ये असं मानलं जातं की, केवळ ओठ पाहूनच व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुण शिवाय भाग्य यांचा अंदाज लावता येतो. प्रत्येक माणसाचा चेहरा आणि ओठ वेगळे असतात .
एखाद्या व्यक्तीचे ओठ लाल असतील तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि धैर्यवान असते. ते उच्च शिक्षित असतात. शिवाय कोणत्याही कामात सावधगिरी बाळगणं हा त्यांचा विशेष गुण असतो.
ज्या व्यक्तीचे ओठ फार पातळ असतात, त्या पुरुषाचा स्वभाव स्त्रियांशी जुळतो. पैसा वाचवणं याला ते प्राधान्य असते. अशा पुरुषांना करिअरसाठी फारशी धडपड करावी लागत नाही. त्याचप्रमाणे अशा पुरुषांना सुंदर वस्तू खरेदी करण्याची आवड असते.
एखाद्या व्यक्तीचे ओठ फार जाड असतील तर ती व्यक्ती क्रूर किंवा कठोर असू शकते. अशी माणसं सामाजिक स्वरुपात अलिप्त राहतात.
ज्या पुरुषाच्या खालच्या बाजूचा ओठ जाड असतो, ती व्यक्ती पैशांसंदर्भात नेहमी चिंतेत असते. ही व्यक्ती अभिमानी स्वभावाची आणि राजा प्रमाणे सुख भोगणारी असते.
ज्या व्यक्तीचे ओठ काळे असतात ती व्यक्ती शिक्षणात हुशार, बुद्धिवान, चतुर आणि संधीचे सोनं करणारी असते. अशा व्यक्ती आपली बुद्धी आणि विवेकच्या बळावर परिस्थिती आपल्या अनुकूल बनवुन घेतात .
तुमचा स्वभाव___होंठा वरुन
हा फक्त लेख आहे.... माझ व्यक्तिगत मत नाही आहे!
झील सी आँखों का ख्वाब बता दो,
इन गुलाबी होठों का राज बता दो,
आखों में तो इश्क नजर आता नहीं
फिर इन शरारती मुस्कानों का राज बता दो
तेरी यादों में हम खुशी की तलाश करते हैं,
अपने होंठों पर हँसी की तलाश करते हैं,
तेरा खूबसूरत खयाल दिल में लिए,
ऐ हमनशीं हम तेरी तलाश करते हैं।
तुमचा स्वभाव___होंठा वरुन

232 

Share


Sangeeta
Written by
Sangeeta

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad