Bluepad | Bluepad
Bluepad
तो
सुमेधा ढोणे
22nd Jun, 2022

Share

तसा तो माझा
आवडीचा विषय....
एखाद्याला एखाद्याचा
इतका नाद लागावा...
माझ्या डोळ्यांची उघडझाप
होताच तुझा चेहरा दिसावा....
तुला हसताना पाहिलं की
मन बहरून यावं...
जणू काही चातकाला
पावसाचं पाणी मिळावं....
तुला पाहायला म्हणून मी
दूरवरून यावं,
आणि तू मला न
पाहताच निघून जावं...
तसं रोज भेट होते
आमची स्वप्नात म्हणा...
तुला दररोज माझ्यात
साठवण्याचा डाव रचते
आणि कधी कधी हारते ...
या गोष्टी तुला कळू नये म्हणून
राग राग करते..
तू पण कधीतरी माझ्या
कवितेची वही मागावी...
तुझ्यावर लिहलेली प्रत्येक
कविता वाचावी....
हे बघ,
तुला गमावण्याची ताकत
नाही माझ्यात,
माझ्या कवितेचा आत्मा आहेस तू..
म्हणून मागे सरकते
सख्या...
तुला मोजता येणार नाही रे
एवढं मी तुझ्यावर प्रेम करते....
-सुमेधा

190 

Share


Written by
सुमेधा ढोणे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad