आज सकाळी मी घरून ऑफिसला निघालो. कार नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कला थांबवून मित्रांसोबत राजकीय कट्ट्यावर बसलो. हल्ली मी वर्तमानपत्रा ऐवजी मित्रांनी दिलेल्या खबरींवर जास्त विश्वास ठेवतो..
गरमागरम राजकीय विषयांवर खूप चर्चा झाली . त्या मित्रांचं एक बरं आहे ...ते वेगवेगळ्या पक्षांचे निष्ठावंत मतदार असले तरी राजकीय चर्चा मात्र दिल खोलके करतात , आपापली भूमिका मांडतात तरीही मैत्रीची आघाडी टिकवतात . मी मात्र अपक्ष नागरीकाची भूमिका मांडत असतो...
पण आजची गंमत काही वेगळीच होती..मी कट्ट्यावरून निघून ऑफिसला पोहोचेपर्यंत माझ्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली होती...मी चेअरवर बसतो न बसतो तोच...
लँडलाईनवर बायकोचा फोन आला...
काय रे कुठे आहेस..? तुझा मोबाईल सतत नॉट रिचेबल येतोय...उगाच भीती वाटते .
जगात काहीही घडू देत ...आपला नवरा रिचेबल असला पाहिजे एव्हढी एकच माफक इच्छा असते प्रत्येक बायकोची..
विनय नारायण
२२ जून २०२२