Bluepad | Bluepad
Bluepad
मी,माझी, मला...…....
सुमेधा ढोणे
22nd Jun, 2022

Share

तुला सजवावे
असं खरंच मला वाटत नाही...
पुढची पाने वाचायची म्हणून
कितीतरी पाने चाळून झालीत...
पण शब्दांचा अर्थ काय उमगला नाही....
हवा तो,हवा तसा अर्थ काढत गेले
हातून काहीतरी निसटत होतं
मी,माझी, मला.....
सगळं काही...
पानावर पान पलटत होते
माझी मी कुठेच सापडली नाही...
मग प्रश्न...
शोधत कुठे होते...
मी,माझ्यात,मला...
सगळीकडे...
मग सगळं काही
बाजूला केले
माझी नजर त्याच्या
डोळ्यांकडे गेली
आणि मला स्पष्ट दिसलं
काय..
मी,माझी,मला...
आणि मग पोटभरून हसले
नवीन कोरं करकरीत पान
त्यावर मी त्याला उमटू लागले
आणि
मी,माझी,मला
मांडू लागले....
कागद संपला...
त्याच्या डोळ्यात
खूप काही साठवून होतं
माहिती नाही,
किती दिवसांपासूनचा हा
संग्रह होता....
मी,माझी,मला.......
-सुमेधा

179 

Share


Written by
सुमेधा ढोणे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad