लेखक ऑफ द विक
" स्पर्धा "
तुमच्या डोळ्यांत अगदी मोठं स्वप्न असेल आणि ते तुम्ही पूर्ण करू शकत नाही अशी नकारात्मक भावना , विचार तुमच्या मनामधे येत असेल तर तुमचा साहस , तुमची मेहनत वाया गेल्यासारखी आहे. प्रत्येक मानवात काही ना काही करण्याची जिद्द असते , मोठे स्वप्न असते आणि ते पूर्ण करावयास अथक परिश्रम करावा लागतो. मनात जिद्द असेल तर कठीण प्रसंगांना सुध्दा सामोरे जाता येते. तुमचा साहस , आत्मविश्वास यशाच्या शिखरापर्यंत पोहचवेल. फक्त मनात सकारात्मक विचार आणि मी हे स्वप्न पूर्ण करणारच , असा गूज कानी पाडत राहा.
आत्मविश्वास असल्याशिवाय माणसाला यश मिळू शकत नाही. तुमचं मन ईकडे तिकडे न भटकता स्वप्नपूर्तीच्या धेय्याकडे लक्ष केंद्रीत करा. जेणेकरून एकाग्र चित्ताने त्या स्वप्नाला लवकर पूर्ण करण्याचा अगदी साधं सोपं मार्ग सापडेल. त्यात अनेक अडथळे येतील. पण वाटेत खूप मोठं संकट किंवा अडचणी आहेत म्हणून मी कोणत्याही कारणास्तव मागे पाऊल टाकणार नाही ह्याचीही तयारी ठेवावी लागते. पायाला काटा रुतला तर रक्त लागतोच , पण टोचलेला काटा सहजपणे काढतो येतो. तसचं जीवनाचं सुध्दा आहे.
एकदा पाऊल मागे टाकलं तर त्या धेय्याकडे पोहचायला वेळ लागेल. जिद्द अशी ठेवा की , रुतलेला काटा सहजपणे निघून जाईल , पण माझ्या केलेल्या अथक परिश्रमाने जीवन उज्वल बनेल. तुमचं भवितव्य सुधारेल. म्हणून नेहमी स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय धरा , अडचणी तर येतच राहतील. त्यात मार्गही सापडेल. असं नाही की तुम्हाला वळणं अगदी सोयीस्कर मिळेल. तुमच्यासोबतच आई - वडिलांचं सुध्दा स्वप्न असतं की माझ्या मुलाने / मुलीने मोठं होऊन नाव कमवावं. मग स्वतः साठी नाही तर कमीत कमी त्यांच्यासाठी तरी कठोर मेहनत करा.
तुमच्या स्वप्नांसोबतच आई - वडिलांचं सुध्दा मन जिंका. फालतूच्या नको असलेल्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. ते फक्तं तुमची गरज भागवतील आणि स्वप्न तुमचे जीवन बदलेल. मग जिवनात तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं व्हायचं असेल आणि स्वतःचे भविष्य घडवायचे असेल तर स्वप्ने अर्धवट सोडू नका , ती जिद्दीने पूर्ण करा. आत्मविश्वास ही अशी ऊर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीला आव्हाने , अडचणी आणि यशासह येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यास धैर्य देते.
कु. सोनाली कोसे , डोंगरगाव