सूर्याचा प्रहर दारी ओलाडला उंबरठा,
नव्याची नवलाई,हाती सजला चुडा,
कपाळी चंद्राची छटा,नाकात मोत्याची नथ.
पाई शोभे पैंजण, बोटे विरूंगी शोभे,
सात निऱ्याची शोभे नव्वारी,
हिरवाईचा चुडा भारी.
मायेची ओढ डोळा,पित्याची लाडाई,
नाविन्याची चढे नवलाई,
पित्या ची सावली जणू पती.
टाक पाऊल नाविण्यात,
नवपूर्णतेच्या छटा दारी,
माय पित्याचा सन्मान दारी.