पावसाळा म्हणले की डोळ्यांना तृप्त करेल असे निसर्गसौंदर्य. अंगाला झोंबणारा गार वारा. डोंगरावरून कोसळणारे धबधबे. रिमझिम पडणारा पाऊस. असे वातावरण असले की मन ही इंद्रधनुष्या सारखे रंगून जाते.
अशा धुंद वातावरणात मनाला कधी रिमझिम पावसात भिजावेसे वाटते तर कधी खळखळनाऱ्या धबधब्याखाली चिंब व्हावेसे वाटते तर कधी घराच्या बाल्कनीत बसुन बरसणाऱ्या जलधारा पहात गरम गरम कांदाभजी खात त्या सोबत वाफाळलेला चहा चे झुरके मारावेत तर कधी वाटते डोंगर माथ्यावरून फिरत मक्याचे कणीस खावे.
पाऊस म्हटले की भौतेक निसर्गप्रेमी पर्यटनासाठी निघतात. ठिकठिकाणी यांच्या स्वगतासाठी भाजलेले मक्याचे कणीस, भाजलेल्या शेंगा, रानमेवा असे स्टॉल लावण्यात येतात. पावसात भिजत गरम गरम भाजलेले मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते.