Bluepad | Bluepad
Bluepad
एकनाथजी शिंदे हे मुरलेले मुरब्बी नेते आहेत..
शिव गोरक्ष उद्योग समूह
22nd Jun, 2022

Share

एकनाथजी शिंदे हे मुरलेले मुरब्बी नेते आहेत..
आज त्यांनी जी काही भूमिका घेतलीये ती असं एका दिवसात नक्कीच घेतलेली नाही हे स्पष्ट आहे..
याच फुलप्रूफ प्लॅनिंग नक्कीच काही महिने अगोदर अतिशय विचारपूर्वक झालेलं असणार आणि आजचा हा शेवटचा डाव टाकण्यासाठी शेवटी विधानपरिषद निवडणुकांचा मुहुर्त निवडला गेला असावा..
जोपर्यंत मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंची नाकेबंदी करून त्यांच्यापेक्षा अधिक आमदार आपल्या गोटात परतवून घेत नाहीत तोपर्यंत एकनाथजी शिंदे आता ऐकणार नाहीत. फक्त आणि फक्त आमदारांचे संख्याबळ आपल्या बाजूला घेवूनच उद्धव ठाकरें कडून हा डाव उधळला जावू शकतो.
अजितदादांच्या बंडावेळी ६ तासात शरद पवारांनी सगळे आमदार आपल्या बाजूला घेवून अजित पवारांना एकटे पाडले होते. तीच किमया यावेळी आता उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे.
परंतु, हे करण्यासाठी आमदारांशी आणि कार्यकर्त्यांशी स्वतःचा डायरेक्ट कनेक्ट लागतो जो उद्धव ठाकरेंकडे अजिबात नाही..
बाकी, पीएच्या भरवशावर पक्ष आणि वाचाळवीराच्या बडबडण्यावर सरकार चालवता येत नसते याची पुरेपूर उपरती आज नक्कीच झाली असेल..

186 

Share


Written by
शिव गोरक्ष उद्योग समूह

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad