आमच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली.मी नोकरी करते. मला 2 मुलं आहेत. मुलगी 11 वीला, मुलगा लहान. सर्व काही नेहमीप्रमाणे चालले होते. खुप कष्टातून, खूप संकटातून संसार इथपर्यंत ओढत आणला. मुलीची 10 वीची परीक्षा चालू असतानाच नवर्याने बॉम्ब टाकला , माझ्याकडून चुक झाली आणी तू तिला अअॅडजस्ट कर.तू कोणाला सांगू नकोस आणी तिला स्वीकार. तू तिला सवत म्हणून स्वीकार.
नवर्याच्या या विचित्र मागणीने, त्याच्या मुलीबद्दल च्या बेफिकीरपणा मुळे , मला दिलेल्या धोक्यामुळे, त्याच्या निर्लज्ज वागण्यामुळे मला खूप धक्का बसला. मी आता जास्त हालचाल करू शकत नाही अशा परिस्थितीत त्याने मला गाठले. मुलीच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये मी आटोकाट प्रयत्न केले.पण तरीही चिडचिड व्हायचीच. मी रात्र रात्र रडायचे , प्रचंड मानसिक ताण , मुलीच्या परीक्षेचा ताण, नवर्याच्या मूर्खपणाचा ताण.
परिक्षा होई पर्यंत दम धरला. परीक्षा झाल्यावर नवर्याला चांगले दमात घेतले. त्या बाईलाही चांगलेच झाडले. नवर्याला सरळ म्हटले ,तुझे एवढेच प्रेम असेल त्या बाईवर तर सरळ मला घटस्फोट दे. पहिली न् दुसरी बायको बनायला मी काही एवढी लो क्वालिटी बाई नाही. पण नवर्याला मला सोडायचे नव्हते. याला कारण त्याच्या नातेवाईकात माझा भरपूर असलेला मान .
त्याला माहीत होते हिला सोडले ,की आपल्याला कोणीच विचारणार नाही. मुर्ख कोणीकडचा. आता सगळे सोडून दिले.