आपण आनंदी नसण्याची सुरवात कशी होते.
आपण आनंदी आहोत की नाही हे आयुष्यात खुप महत्वाचे असते.आनंदी नसणे म्हणजे सतत कोणत्या तरी गोष्टीसाठी तुम्ही दुःखी होत असणार.आनंदी म्हणजे काय नुसता हसतमुख चेहरा का ? तुम्ही मनापासून आनंदी सुखी आणि समाधानी आहे का? आनंदी असाल तर खूपच छान.परंतु जर आपण मनातल्या मनात कोणत्याही गोष्टीसाठी घालमेल चालू असेल तर नकळत आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतं असतो.
आपण आनंदी आहे का हे आपल्याला कोणाला ओरडून सांगायचे नाही परंतु आनंदी आहोत का ? हे स्वतःला माहित असणे गरजेचे असते.तुम्ही मानसिक स्थितीतुन जात असाल तर वेळीच मनाला शांत करणे गरजेचे असते.तुम्ही जेव्हा काळजीत असता तेव्हा तुम्ही चालण्याचा जर व्यायाम केला तर तुम्ही खरोखर सगळ्या गोष्टी विसरून जात असता.
आपल्याला सगळ्याच मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला सांगता येत नाहीत.मग अशा वेळी कोणत्याही प्रकारचा साधा व्यायाम तुम्हाला मदत करू शकतो.
तुम्हाला आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायचा आहे.तर आणि तरच आपण आनंदी होऊ शकतो.प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भावनांशी तुम्ही खेळत असाल तर तुम्ही दुःखी होतं राहणार.
आयुष्यात तुम्ही आनंदी आहे की नाही याचे कोणाला काही देणे घेणे नसते.त्यामुळे दुसऱ्यापेक्षा आपण किती आनंदी आहे हे खुप जास्त महत्वाचे असते.
आपले दुःख जसे सांगतो तसेच तुम्ही कशामुळे आनंदी आहात हे समोरच्या माणसाला सांगा त्यामुळे एक छान आनंदी वातावरण निर्माण होतं राहील.
पुजा काळेल.