Bluepad | Bluepad
Bluepad
सख्खे नाते सतत दुःख का देतात
Sachin Deulkar
Sachin Deulkar
22nd Jun, 2022

Share

*सख्ख्याच्याच ठायी का वसतात मत्सर, सूडबुद्धी, द्वेष आणिअहंकार कि जो साधतो विध्वंश मानव जातीचा.*
*आतिशय सुंदर लेख आहे🙏🌹❣️.
🤝🤝🤝🤝
*फक्त प्रेम करा !*
*सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी*
*नेमकं काय असतं हे "सख्ख प्रकरण?"*
*सख्खा म्हणजे आपला सखा.*
*सखा म्हणजे जवळचा*
*जवळचा म्हणजे ज्याला आपण* *कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो.*
*त्याला आपलं म्हणावं,*
*त्याला सख्ख म्हणावं !*
*सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावरपण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते पथ्य असते.*
*ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो,*
*मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा *काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !*
*ज्याच्याकडे गेल्यानंतर*
*आपलं स्वागत होणारच असतं*
*आपल्याला पाहून त्याला हसू*
*येणारच असतं*
*अपमानाची तर गोष्टच नसते*
*फोन करून का आला नाहीस अशी* *तक्रारही नसते !*
*पंढरपूरला गेल्यावर*
*विठ्ठल म्हणतो का .....*
*या या फार बरं झालं !*
*माहूर वरून रेणुका मातेचा*
*किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !*
*मग आपण का जातो ?*
*कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून !*
*हा ही एक प्रकारचा " आपलेपणाच !"*
सख्खे नाते सतत दुःख का देतात
*लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ?*
*किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?*
*काहीच नाही.*
*रुक्मिणी काय पाठीवरून हात *फिरवून म्हणते का,*
*किती रोड झालीस ?*
*कशी आहेस ?*
*सुकलेला दिसतोस,*
*काय झालं ?*
*नाही म्हणत.*
*मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?*
*पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?*
*प्रेम, माया, आपुलकी, विश्वास*
*म्हणजेच "आपलेपणा !"*
*हा आपलेपणा काय असतो ?*
*आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ*
*भेटल्या नंतर बोलण्याची ओढ*
*बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ*
*निरोप घेण्या आधीच पुन्हा*
*भेटण्याची ओढ !*
*ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं *त्याला आपलं म्हणावं*
*आणि चुलत, मावस असलं तरी*
*सख्ख म्हणावं !*
*मी त्याचा आहे आणि तो माझा*
*आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे .....*
*म्हणजे " आपलेपणा ! "*
*एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात* *आणि निःसंकोचपणे* *गालावरून ओघळू लागतात*
*तो आपला असतो ,*
*" तो सख्खा असतो !"*
*लक्षात ठेवा,*
*ज्याला दुसऱ्या साठी "सख्ख" होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं,*
*बाकी फक्त परिचितांची यादी असते*
*नको असलेल्या माणसांची गर्दी असते !*
*तुम्हीच सांगा.....*
*फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?*
*ज्याला तुमच्या दुख्खाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?*
*आता एक काम करा..*
*करा यादी तुम्हाला असणाऱ्या*
*सख्ख्या नातेवाईकांची..*
*झालं न धस्सकन..*
*होतयंन धडधड..*
*नको वाटतंय न यादी करायला ....*
*रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी..*
*आणि मानायला लागा सर्वांना* *आपलं कोणी कितीही झिडकारलं तरी*
*कारण .....*
*राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही*.
*जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं.....वीराने नाही*

171 

Share


Sachin Deulkar
Written by
Sachin Deulkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad