Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष..
Balaji G Dhote
Balaji G Dhote
22nd Jun, 2022

Share

☘आयुष्य तेच आहे☘
🌿आयुष्य तेच आहे, स्वप्नं खोटेच आहे भानावर येताच, वास्तवाचे चटकेच आहे आयुष्य तेच आहे, मधूर गाणेच आहे निसर्ग छेडी संगीत, लयबद्ध होणेच आहे.🌿
🍁आयुष्य तेच आहे, माणसांचे मळेच आहे एखादं दुसरा सजीव, बाकी निर्जीव पुतळेच आ आयुष्य तेच आहे, सांगतात सारेच आहे एक सारखं वाटतं नाही, आयुष्य कुठेच आहे.🍁
🌿आयुष्य तेच आहे, अधांतरी वाटेचं आहे मृत्यूच एक सत्य, बाकी खोटेचं आहे. आयुष्य तेच आहे, सौंदर्यांवर भाळलेच आहे मी मागितला चंद्र, हात पोळलेच आहे.🌿
🍁आयुष्य तेच आहे, वेडे म्हणणारे खुळेच आहेत शहाण्यांची ओळख, वेड्यां मुळेच आहे आयुष्य तेच आहे, प्रश्न वाकडेच आहे मनाला जे पटतं, मेंदूसाठी कोडेच आहे.🍁
🌿आयुष्य तेच आहे, हलके फुलकेच आहे आठवणी राहील्या मागे, समाधान इतुकेच.🌿

115 

Share


Balaji G Dhote
Written by
Balaji G Dhote

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad