" अमित क्या बात है..मक्याचे कणीस?"
" अरे यार , या मक्याच्या कणसाचे तर आपली मैत्री जमली..."
"तुला आठवतंय अजून ?"
" अरे , विसरलोच नाही...आठवतंय काय?"
"चांगलेच आठवतंय , पावसाचे दिवस होते..सतत पाऊस पडत होता..नदीला पाणी आले होते..त्या दिवशी शाळा लवकर सोडली..नववीत होतो ना आपण..? "
" हो येस्स...नववीत.. शाळा सुटली तशी निघालो पाणी बघायला..."
" पुलावर ही गर्दी जमली होती.. प्रत्येक जण एन्जॉय करत होता..व.पा.भजी.. खमंग वास भरून राहिला होतो...नकळत पोटातली भूक चालवली ...सगळ्यांनी वडापाव घ्यायचा ठरवले..माझ्या खिशात जेमतेम चार रूपये होते..बसने घरी जायला ठेवलेले..मी नाही घेतला..थोडे पुढे गेलो तर काॅर्नरला कणसाची गाडी उभी होती.. गरमागरम कणीस.लिंबू मिठ चोळलेले.. बहुतेकांनी कणसे घेतली..माझ्याकडे पैसेच नव्हते...मी नदीचे पाणी बघत उभा होतो...तेवढ्यात ती आलास पानावर गरमागरम कणीस घेऊन...अम्या..चल घे . ."
" अरे नको मला.."
" अरे घे रे यार ...घे...दोघे मिळून खाऊ...एक घास तू एक मी..."
" नको रे नको..माझ्याकडे पैसे नाही .."
" बस्स का यार..पैसे कुणी मागितले का..हीच का यारी.."
" तुझा आग्रह मोडणे शक्यच नव्हते..त्या कणसाची गोडी अवीट होती..लिंबू मीठ लावलेले असे कणीस मी प्रथमच खात होतो.. आनंदही होता. अन्...डोळ्यात पाणी..डोळे वहायला लागले.."
" कारे अम्या डोळयात पाणी.."
" काही नाही रे.."
तू गळ्यात हात टाकलास..आणि आपण दोस्त झालो..पक्के दोस्त.."
" अरे यार काय दिवस होते ना...ते..अम्या त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी का आले रे...तेव्हा नाही सांगितलेस..इफ यू डोन्ट ..आज सांगशील? "
" नववीचे ते वर्ष आणि दहावी आपण जाम मजा केली .शाळेच्या सगळ्या अॅक्टिव्हिटी गाजवल्या..अभ्यासही खूप केला जोडीने..खरं सांगू का रोहन्या ,तुझ्याशी दोस्ती हा माझ्या आयुष्यातील टर्निंगपाॅईंट ठरला ..माझे लाईफच बदलले.."
अमितला आज खूप बोलायचे होते...खूप दिवसांनी..रोहन्या ,जिगरी दोस्त भेटला होता..
" दहावीचा निकाल लागला...तू सायन्सला एफ् सीत अॅडमिशन घेतलीस ,मला कंपनीत ट्रेनिंगला अॅडमिशन मिळाली..दोघांच्या वाटा बदलल्या..."
" हो ना रे आणि साल्या आज भेटतोय.."
" तू गेलास इंजिनिअर होऊन यू एस ला.. मी ट्रेनिंग झाल्यावर कंपनी जाॅईन केली...आता ..सुपरवायझर आहे...मस्त चाललंय.. फेस बुकवर दिसलास... रिक्वेस्ट टाकली...आणि पुन्हा भेटलो यार..."
" तुझी रिक्वेस्ट बघून मी उडालोच..सगळे दिवस लख्ख आठवले..., किती वर्षाने भेटतोय यार..लई भारी वाटतंय.."
" तू साल्या माझ्या कायम स्मरणात राहिलास..तुला कल्पना नाही यार तुझ्या संगतीत मी पार बदललो..मुख्य म्हणजे अभ्यासाला लागलो.. आपल्या दोस्तीची सुरवात या कणसा पासून झाली..तू विचारलेस ना तुझ्या डोळ्यात पाणी के आले...घरची गरिबी..आई मंडईत भाजी विकायची..बाबा मिळेल ते काम करायचे..त्या दिवशी पुलावर बाबांनी कणसाची गाडी लावली होती...लिंबू मीठ लाऊन देणारी माझी आई होती...रोहन.. त्या दिवशी..गरिबीची लाज वाटली..मला काही सुचत नव्हते..तिथून पळून जावेसे वाटत होते...कदाचित मला बाबांनी कणीस दिले असते...पण..पुढे जाऊन गाडीवर त्यांना ओळख द्यायची लाज वाटली...इतर दोस्तांच्या पुढे.."
आपल्या दोस्तांना कळू नये म्हणून पळून पळून जावेसे वाटत.होते...तेवढ्यात तू कणीस घेऊन आलास..आग्रहाने खायला घातलेस.. मला काहीच सुचेना..कधी डोळ्यात पाणी जमा झाले कळलेच नाही..तेव्हा आईबाबांना ओळख द्यायचे टाळले ...आजही ती गोष्ट खातेय बघ.."
" आज सगळे झकास आहे..स्वतःचा फ्लॅट आहे..गाडी आहे.. मुले हुशार आहेत..आपण परत भेटतोय ..ठरवलं..तुला जेवायला बोलवायचे..तू..म्हणालास हाॅटेल मध्येच जाऊ.. यार आपण माझ्या घरी जेवायला जातोय..म्हटलं त्या आधी पुलावर जाऊन कणीस खाऊ यात .. आज आई वडील घरी आहेत..आईने झकास पुरणपोळी केली आहे खास तुझ्यासाठी..
आज तुझी ओळख करून देतो..आई बाबांशी. .खूप केलंय रे त्यांनी माझ्यासाठी.. पुलावरची कणसाची गाडी आपलीच आहे बरं का..आता एक मुलगा ठेवलाय तो आणि त्याची बायको बघते..चल..प्रथम कणीस खाऊया.."
" अमित यार .." रोहनला पुढे काही बोलवेना...
" अरे चल यार आज तुला मी कणीस देतो..."
रिमझिम पाऊस पडत होता..नदीला पाणी आले होते..पु.ला.वर ही गर्दी होती..त्यात दोन जिगरीदोस्त चवीचवीने कणीस खात खात गप्पा मारत होते..कितीतरी वर्षांनी भेटलेले..
परिस्थीती बदलली होती...पण..कणसाची चव तिच होती..