खरे दिवस तर शाळेचे होते,
मनसोक्त बागडण्याचे होते
सकाळी उठवलं म्हणून जायचे होते
घंटा वाजली म्हणून वापस यायचे होते
खरे दिवस ते फक्त शाळेचे होते.........
ना कुठला वणवा विझवायचे होते,
ना कुठली चिंगारी पेटवायची होती.....
फुलपाखरा वानी फक्त बागडायचे होते....
खरे दिवस ते फक्त शाळेचे होते......
ना चिंता ....... नाही ही कसली काळजी,
मार खाऊन फक्त होम वर्क करायचे होते,
खरे दिवस फक्त शाळेचे होते.....
ना जमापुंजी ..... नाही खर्च करायचं टेन्शन
काय काय हवंय फक्त करायचं mention
प्रत्येक demand ला रडका भोंगा तानायचे होते
खरे दिवस ते फक्त शाळेचे होते......
पाठवरती ओझे होते,.... पण त्या ओझ्याला
जबाबदारी कळत नव्हती.,,.......
पाठ्य पुस्तकातली कविता गाताना....
सुरात सरगम च साथ नव्हती,........
गणितातील पाढे, आज ही आठवती....
मोठ्याने ओरडून पाठ करायचो,
चुकलोच ...... चुकलोच कधी तर रट्टा अजून मारायचो
पण त्याला आजच्या आबॅकस ची सर नव्हती
खरे दिवस ते फक्त शाळेचे होते.,..
मनसोक्त फक्त बागडायचे....
म्हणूनच बोलतात
दिवस ते फुलायचे...... झोपाळ्या वाचून झुलायचे ,
पंखांना बळ यावे म्हणुनी, वाऱ्यासंग भिरभिरायचे
खरे दिवस ते शाळेचे होते..,.हो ना