बऱ्याच वेळेस आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या मनाला पटत नाहीत. पण आपण दुर्लक्ष करून त्या मान्य करतो. उदा. एखाद्या वेळेस आपले मित्र मैत्रिणी कुठेतरी फिरायला जायच म्हणून तुम्हाला सोबत घेण्यासाठी तुमच्याकडे येतात. परंतु तुमची इच्छा नसते त्या वेळेला बाहेर जाण्याची पण तुम्ही त्यांना दुःखउ शकत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाता. अशा वेळेला तुम्ही त्यांना विरोध केला पाहिजे. कारण त्याने तुमच्या कामाचे नियोजन बिघडते आणि तुम्हाला तशीच सवय लागून जाते, विरोध न करण्याची आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक मनोरंजनाचे साधन तयार होता. म्हणून आपल्या मनाच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टीचा विरोध आपण केलाच पाहिजे तो आपला हक्कच आहे.