Bluepad | Bluepad
Bluepad
उपवासाच्या दिवशी 'ह्या' गोष्टी पूर्णपणे टाळा!
D
Dhanashri Godbole
22nd Jun, 2022

Share

भारतीय संस्कृतीत धार्मिक व्रतवैकल्यांना खूप महत्त्व आहे. व्रत आणि उपवास यांची सांगड पूर्वीपासून घातली गेली आहे. या दिवशी देवाचे नामस्मरण करून आपले मन भक्तीमध्ये रममाण करावे लागते. पण या दिवशी नकळत काही चुका होऊन आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी आपण कोण कोणत्या गोष्टी टाळायला हव्या.

उपवासाच्या दिवशी 'ह्या' गोष्टी पूर्णपणे टाळा!

१) व्यायाम करणे टाळावे:
व्रत वैकल्ये करताना कृपया व्यायाम करणे, सकाळ संध्याकाळी जास्तीचे फिरणे टाळा. जर तुम्ही अतिरिक्त व्यायाम केला तर व्रत आणि प्रार्थनेवर त्याचा परिणाम होतो. जर तुम्ही ३ ते पाच दिवसांचे व्रत करत असाल तर व्यायाम करू नका, जिममध्ये जाऊ नका. शरीरातील उर्जा कमी झाल्यामुळे तुमची शक्ती लवकर नष्ट होईल, तुमची शारीरिक ऊर्जा कमी होईल.

२) खोटे बोलू नका:
व्रत करणे हे एक पवित्र कार्य आहे. त्यादिवशी देवाची प्रार्थना केली पाहिजे. व्रत सुरू असताना खोटे बोलू नका. एकीकडे तुम्ही भगवंतांची स्तुती आराधना सुद्धा करता आहात आणि दुसरीकडे जर तुम्ही खोटे बोलत असाल त्याचे फळ लाभत नाही असे म्हणतात. मनात पवित्र भाव असलेल्या व्यक्तीलाच अशा व्रतांचा लाभ होतो.

३) गर्व आणि राग करू नका:
जेव्हा तुम्ही व्रत आणि प्रार्थना करत असाल तेव्हा गर्व, क्रोध, अहंकार करू नये. यांसारखी आध्यात्मिक पापे टाळली पाहिजेत. आपण ईश्वराची लेकरं आहोत. ईश्वर भक्तीत आपण शून्य आहोत असं समजून सारा अहंकार, राग सोडून द्या. कटुता, मत्सर, संताप, मत्सर यांचा परिणाम आपल्या हृदय आणि चारित्र्यावर होतो त्यामुळे या गोष्टी टाळा.

४) ढोंगीपणा आणि आळस करू नका
तुमचा व्रत हा तुम्ही मौजमजेसाठी किंवा दिखाव्यासाठी करत नाही आहात. तेव्हा तुम्ही व्रत आणि प्रार्थना करत आहात हे तुम्ही संपूर्ण जगाला कळवू नका. ते कोणापाशी शब्दाने किंवा कृतीने जाहीर करू नका. व्रताच्या दिवशी आळस करू नका, उत्साही रहा. अत्यंत आनंदाने देवाचे नाव घ्या. तुम्हाला निश्चितच त्याचे फळ मिळेल.

५) दारू आणि मांसाहार वर्ज्य करा:
जर व्रत उपवासाच्या दिवशी तुम्ही दारू पिल्यास तो परमेश्वराचा अनादर ठरतो. तसेच मांसाहार हा जिभेने पाणी पिणाऱ्या प्राण्यांचा आहार आहे. व्रत, उपवासाच्या दिवशी प्राण्यांना मारून मांसाहार भक्षण करणे हे शास्त्रात पाप मानले जाते. दारू आणि मांसाहार हे तमोगुणी आहेत, त्यामुळे तुमच्या मनाची चंचलता वाढते, वजन वाढते, आळस उद्भवतो, झोप आणि रागावर नियंत्रण राहत नाही, यासाठी आपले आपल्या जीभ, पोट आणि इंद्रिये यांवर ताबा हवा.

६) चमचमीत पदार्थ खाणे टाळा:
आहारतज्ञांच्या मते, उपवासात संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. तळलेले पदार्थ, शेंगदाणे, बटाटा, नायलॉन शाबुदाणा, त्याचे वेफर्स, अशा चमचमीत पदार्थाचे सेवन केल्यास नक्कीच आणखी पित्तवृद्धी होऊन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीराला पोषण मिळेल असे अन्न खा. जसे ताक आणि लिंबूपाणी दिवसभर घेत राहिल्यास शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि ऊर्जाही मिळेल.

७) भरभर जेवू नका:
व्रत नेहमी सूर्यास्तपूर्वी सोडावा जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होते. "जरा माणसासारखा जेवण कर" असे लहानपणी आपल्याला समजावले जायचे. पण हे खरेच आहे. व्रत सोडताना खूप भूक लागली म्हणून भराभर खाऊ नका. त्यामुळे अन्न आरामात पचले जाऊन नंतर पोटाला त्रास होणार नाही. व्रत सोडताना गव्हाची पोळी, एखादी फळभाजी, मुग डाळीचे कढण, काकडी, लाल भोपळा याची भाजी, कोशिंबीर असे अन्न खावे.

व्रत म्हणजे पापांचा नाश करून सद्गुणांचा स्वीकार करणे. हरी भक्तीत मन लीन करून मनाचे स्वास्थ्य चांगले राहो म्हणून आपण व्रत धरतो. व्रतांमध्ये नेहमी अन्नाचा उपवास धरतो. परंतु या दिवशी मनातील स्वार्थ, वाईट विचार यांचाही उपवास केल्यास मनाचे स्वास्थ्य आणखी चांगले होईल. "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" हा तुकोबांचे भजन खऱ्या अर्थानं सिद्ध होईल.

396 

Share


D
Written by
Dhanashri Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad