हिरव्यागार लांब अश्या सालीखालचे टपोरे मक्याचे दाणे सालीखालच्या करड्या शेंडीच्या झुबक्यामध्ये लपलेले शेंडी बाजूला करून मक्याच्या दाण्याच्या अंगाला तूप चोळून चाहूबाजूने त्यावर हलकेच मीठ चोळले आणि खाल्ले की जी चव मक्याच्या या दाण्याची मुखी उतरते ती आवर्णनीय आशिच असली तरी तीचे थोडक्यात वर्णन करायचे तर ' हाय कंबक्त तुने खाया ही नहीं अशी करावी लागेल.
एकदा खाल तर सारखे सारखे याल असाच मोह. रस्त्यावरच्या गाड्यावरच्या मोठ्या शेगडीत विस्तव चाटचाट करीत असतो. विस्तवाचे निखारे उडत असतात शेगडीवरच्या विस्तवावर मोठी लोखंडी जाळी त्यावर मक्याच्या कणसाला साधारण काळी पडेपर्यंत भाजून गरम गरम मक्याचा कणसाला तूप चोळून मीठ लावून गाडीवर येणाऱ्या रसिक खवाय्याला खायला दिले जाते. हा खाण्याचा सोहळा थेट मनात जाऊन भिडणारा.
कणसे उकडून खान्यात जी मजा आहे ती प्रत्यक्ष खाऊनच अनुभवलेली अधिक चांगली. हरबऱ्याच्या डाळीची उसळ करतात तशी या मक्याच्या दाण्याची उसळ एकदा तरी घरी खाऊन पाहावी अशी.
पॉप कॉर्न याने की गरम लाही फोडणी दिलेली त्या ठराविक रंगीत नक्षीच्या दंडगोलाकार भांड्यातून सिनेमाच्या किंवा नाटकाच्या मध्यंतरातल्या अंधारवजा वातावरणात बाहेरच्या स्टॉल वरून, गाड्यावरून आणून सहकुटुंब नाटकाचा किंवा सिनेमाचा स्वाद घेतं खान्यातील मजा आपण बहुते कानी चाखली आहेच..
काही सिनेमागृहाच्या जवळपास मक्याची कणसे प्रेक्षकांना उपलब्ध करून दिलेली असतात कणसाच्या मोसमात. सोलून उस खाणे,सोलाण्याच्या पेंडीतला सोलाना तथा ढाळा खाणेतेही कणसा बरोबर अपूर्वाई वाटावी अशी
.गोडवे कणसा चे गावे किती. विविध पदार्थ नाश्त्यासाठी करून खातो आपण. सलाड मधेपण दिसतात मक्याच्या कणसाचे दाणे. मस्त दाणेदार कणसे खायला चविष्ट. लहान मुमुळापासून. ते वृद्ध माणसापर्यंत सर्वाना कणीस अतिशय प्रिय.
या कणसात अ, ब आणि ई व्हिटॅमिन असते ती शरीराच्या आरोग्यास पोषक असते. कणसाचे खाण्याने माणसाची पचन शक्ती सुधारण्यासाठी बहुमोल काम केले असल्याचे सांगितले जाते.कणसाने त्यांच्या खाण्याने माणसाच्या शरीरातली हाडे मजबूत होतात.,कर्क रोगापासून संरक्षण मिळते, साखर नियंत्रणात येते असे सांगितले तर खरे नाहीं वाटणार पण ते खरे असल्याचे तज्ञ सांगतात. वाचनात आले होते.
लाह्या, ब्रेड, सायरप, स्टार्च, ग्लुकोज, अगदी प्लास्टिक, गोंद, कृत्रिम रबर, बूटपॉलिश एवढेच काय अगदी रेक्सिन, अल्कोहोल पण तयार होते मक्यापासून! युरोपात स्पॅनिश लोकांनी मका आणल्याचे जाणकार सांगतात. या मक्याचे शास्त्रीय नाव ' झिया मेझ ' ही आहे मूळची अमेरिकेची अश्या या दाणेदार चवदार मक्याची चविष्ट कहाणी सुफळ संपूर्ण.
.. शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.