वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या वाक्याचा अर्थ असा की वृक्ष हे आपले सखा,सोबती,मित्र असतात.मित्र जसे आपल्याला प्रत्येक संकटाच्या वेळी साथ देतात, तसेच वृक्ष म्हणजेच झाडे देखिल आपल्याला कळत नकळत साथ देत असतात.वृक्ष आपल्याला सावली देतात.आपल्या जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आपल्याला देतात.
आपण ज्या वृक्षांमुळे जगतो ,त्याचा नाश करणे ही कल्पनाच आपल्याला कशी करविते. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याचाच नाश केला तर ;आपण आयुष्य जगुन काय फायदा:
वृक्ष हे आपल्या संस्कृतीतील खुप महत्वाचा घटक आहे. पण हे आपल्या असामान्य बुद्धिला पटेल तर खरं ! सध्या वृक्षतोडीचे प्रमाण खुप प्रचंड प्रमाणात वाढले आहे.कोणी नवीन घर बांधण्यासाठी, कोणी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, जळणासाठी वृक्षांचा नाश करत असताना दिसत आहेत.
वृक्षांचा नाश म्हणजे आपल्या संस्कृतीचा नाश होय.आपण घरातील कोणतेही शुभकार्य,पुजा संस्कृतीचा मान ठेवून म्हणजेच विधीपूर्वक करतो.पण सध्याच्या काळात या कार्यासाठी लागणारे आंब्याचे डहाळे,ऊंबराचे डहाळे,करदळिची पाने मिळेनासे झालेत.असेच जर सुरू राहिले तर, आपल्या संस्कृतीचा नाश झालेला आपल्याला कळणार ही नाही. त्यामुळे आपण वृक्षतोड थांबवली पाहिजे.
जर आपण एखादे वृक्ष तोडले तर त्यांच्या बदल्यात दोन झाडे लावली पाहिजेत.फक्त वृक्ष लावले म्हणजे झाले नाही ;त्याला खत पाणी घातले पाहिजे. जितकी जास्त वृक्ष असतील तितके जास्त आपण आपल्या संस्कृतीचे जतन करु शकतो.
वृक्षनाश म्हणजे आपल्या संस्कृतीचा नाश होय. त्यामुळे "झाडे लावा,झाडे जगवा; संस्कृती व पर्यावरणाचे रक्षण करा" 🙏🏻🙏🏻