पावसाळा सुरु झाला कि मनातुन गरमागरम मक्याचं कणीस खाण्याची इच्छा नक्कीच होते.
पावसात ओलेचिंब भिजुन यायच आणि गरमागरम कणसाला हिरवी तिखट चटणी लावून खाताना खुप मज्जा येते.
गरमागरम कणीस आणि त्याला लावलेली तिखट हिरवी चटणी नाकातून डोळ्यातुन नक्कीच पाणी आणते. पण नाका डोळ्यांतुन किती ही पाणी आल तरी हातातून कणीस सुटत नाही.
मला आठवत आम्ही मैत्रिणी पावसाळ्यात कणीस खायला मुद्दाम जात होतो.
मक्याच्या कणसाला काही ठिकाणी भुट्टा देखील म्हणतात.
गाडीवरच चांगले कणीस शोधून काढणे हि एक कला आहे.
कणसाचया गाड्या एका लाईनित लागलेल्या असतात. कणीस कोणत्या गाडीवर चांगले आहे, प्रथम हयाचा शोध घेतला जातो, आणि मग एखाद्या गाडीवर खुप छान कणस सापडतात.तयाचे दाणे अगदी मोती सारखे दिसतात.मग त्या गाडी जवळ थांबुन चांगलं कोवळ कणीस निवडल्या जात, आणि मग ते भाजायला दिल जात. भाजायचया आधी कणसाच वरच आवरण काढून मग भाजल्या जात.कोळशयावर कणस भाजताना खुप छान धुरकट वास येतो. त्या वासानेच कणीस खाण्याची इच्छा अजून तीव्र होते.कणीस भाजल्या वर भुट्टे वाला विचारतो दिदी लिबु हरी चटनी लगानी है क्या मी हो म्हटल्यावर ती झणझणीत चटणी आणि लिंबू लावल जात.आणि ते भाजलेले कणीस मक्याच्या पानात ठेवुन आपल्याला दिल जात.
एक घास खाल्या बरोबर अजुन दूसरया कणसाची आर्डर नक्कीच दिली जाते. कणीस खाताना एक से मेरा क्या होगा अशी स्थिती असते.
मक्याच्या कणसा मध्ये साधारण दोन प्रकार मिळतात. अमेरिकन स्वीट कॉर्न आणि साध आपल देसी कणीस.
आई मक्याच्या कणसाचे वडे अप्रतिम बनवते. कणस बाजारात आली की बाबा आठवणी न वड्या साठी कणस घेऊन येतात. मग आमचा संध्याकाळ चा बेत गरमागरम मक्याच्या कणसाचे वडे आणि चहा असा बेत असतो.
अरुंधती धर्माधिकारी कुंडले
वाकड पुणे