तुझ्यासोबत घालवलेला वेळ
तुझ्या सोबत काढलेले प्रत्येक फोटोग्राफ
प्रत्येक भेटीत घडलेले सुखदुःखाचे क्षण
हृदयाच्या एका कोपऱ्यात गुपित ठेवलेली आहे
तुझ्यावर माझं रागवणं रुसून बसन
कितीही रागावून बसले तरी
तुझ्या एका स्माईल नेच माझा रुसवा दूर व्हायचा
तुझ्या सोबत गप्पा करत असताना
वेळ कसा निघून जायचा कळतच नव्हतं मला
असं वाटायचं
सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांना
कैद करून ठेवायची इच्छा व्हायची....