Bluepad | Bluepad
Bluepad
पावसाळा आणि मी आणि शाळेतिल आठवणि
Rupali Bhise
Rupali Bhise
22nd Jun, 2022

Share

पाऊस म्हंटले की डोळ्या समोर एकच दृश्य येणार काळभोर आभाळ चा गडगडाट ,विजांचा कडकडाट आणि पडणारा तो पाऊस रिमझिम रिमझिम ,कधी धोधो येणार पडणार कधी हलके अंगण ओले करणार तर कधी नाकीनऊ आणणारा अगदी पुरच मग तर, असे किती तरी किस्से मला आठवतात लहानपणीचे ,तसचे आता सध्या नव्याने सुरू झालेल्या ढग फुटीचे अगदी अंगावर काटे येतात जेंव्हा पण ढग फुटीचे बातम्या वाचताना ,पाहताना.
मला आठवताट माझ्या पावसाळ्यातील आठवणी ,
मला पावसात म्हणजे पहिल्या पावसात भिजायला खूपच म्हणजे खुप आवडायचे तसे आता पण आवडते बरका, पण आता सासरी काही वेळा नाही होत श्यक, जेंव्हा पण पहिल्या पाऊस पडणार तेंव्हा आवर्जून क्लास ला सुट्टी द्याचे मी आणि मनसोक्त पहिल्या पाऊसाची मज्जा घ्याचे, आई खूप चिडयाची अग सर्दी होईल आजारी पडशील , पण मी ऐकत नसे घरात कुणाचे या बाबतीत तरी ,
माझे माहेर धुळे खान्देश कन्या मी ,आमच्या धुळे शहरात पांझरा नदी वाहते ,आधी खूप पाणी असे नदीला पण आता जास्त पाऊस पडला तर येते नाही तर, वाहते पाणी नसते ।
एक वर्षी असेच खूप जोराचा पाऊस पडत होता नदीला पूर आला अस सर्व सांगत होते. आणि पुला वरून पाणी वाहिल इतके पाणी नदीला आले आहे सवत्र चर्चा चालू झाली ।
माझ्या वर्गात आणि आमच्या शाळेत पुल ओलांडून राहणाऱ्या काही मुली होत्या , जेंव्हा त्यांना अस सांगितले जात तेंव्हा त्यांचे एकच धावपळ उडत आम्हि घरी कसे जाणार , या विचाराने काही तर रडायला लागत , मी व बाकी वर्ग मैत्रिणी त्यांची समजूत काढत.
असेच एकदा आम्ही सर्व मैत्रीणी त्या नदीचे पाणी किती आले ते पाहायला गेलो होतो , खूप असे खळखळ पाणी वाहत होते तेंव्हा ,एक मैत्रीण बोलली की आता मस्त गरमा गरम चहा हवा, आणि गरम भजी मी तिला म्हणाले अग भजी तर मिळतील की माहीत नाही पण चहा मनक्कीच मिळेल अगदी कडक लाल रंगाचा हवा तितका पी मग ,
ती म्हणाली तू पाजते का? मी हो म्हटले ,फक्त आता ग्लास हवे होते ,ती म्हणाली म्हणजे ......?
अग आपण चहा किती बनलाय आणि किती वाहतोय तेच तर पाहायला आलो आहे ना मी म्हणटले तिला तेंव्हा बाकी सर्व मैत्रीण खूप हसू लागल्या। खूप छान दिवस असतात पण शाळेचे आणि ते पावसाळ्यात मग तर मजा च मजा ......😊
अजुन एक किस्सा आठवतो मला , मे शाळेत सायकल वर जात असे , सायकल चे चाक घसरून एकदा अशीच जात असताना पडले ,लागले मला खुप जोरात आजूबाजूच्या लोकांनी उचलले आणि मग शाळेत गेले ,कपडे खराब झाले होते, रडायला येत होते ,पण काय करणार जावे तर लागणार ना कारण शाळा आणि घर खूप लांब होते नि मी शाळा जवळ च पडले होते ,त्यात उशीर झाला म्हणून शाळेत शिक्षा मिळाली 50 उठाबश्या ,पण माझा रडका चेहरा पाहून बाईंनी शिक्षा नाही दिली . पण काही ही असो शाळेतील दिवस खरच खूप छान असता ते जेंव्हा कळत तेंव्हा आपण शाळा सोडलेली असते। शाळेत तुन घरी जाताना पाऊस पडायला लागला की मि मुद्दामुन सायकल हळू चालवणार आणि मनसोक्त भिजनार ,घरी जाऊन आईचं ओरडणं फिक्स असायचं मग ।
एक लहान पण आणि शाळा हे दिवस निघून गेले की हवे हवेशी वाटतात😔
पावसाळा आणि मी आणि शाळेतिल आठवणि

112 

Share


Rupali Bhise
Written by
Rupali Bhise

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad