Bluepad | Bluepad
Bluepad
पुराणकाळात वानर माणसांप्रमाणे हुशार का होते?
N
Nandkumar Gawali
22nd Jun, 2022

Share

पौराणिक काळात माकड हा एक शूर प्राणी होता. अनेक मोठमोठ्या युद्धात त्याने देवांना मदत केल्याच्या कथा आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत पुराणकाळातील माकडांच्या कथा.

काही पौराणिक कथा जिथे वानर हा मुख्य पात्र होता:
पौराणिक ग्रंथानुसार वानर हा दक्षिण भारतात राहणारा एक प्राचीन मानवी समूह होता. त्यांचा वाल्मिकी रामायणात अतिशय अभिमानास्पद उल्लेख आढळतो. रामायणात उल्लेखलेली माकडे माणसांसारखीच हुशार होती. ते मानवी भाषा बोलायचे. अंगावर वस्त्र घालायचे. घर, महालात राहायचे. ते सुद्धा विवाह संस्कार करायचे आणि राजाच्या अधिपत्याखाली राहायचे. यावरून हे स्पष्ट होते की, रामायण काळात वानर म्हणजे प्रत्यक्षात एका मानव जातीचे लोक होते.

पुराणकाळात वानर माणसांप्रमाणे हुशार का होते?

काही तज्ञांच्या मते, हे लोकं खरोखर वानरांसारखे दिसत होते, म्हणून त्यांना वानर हे नाव पडले. हे लोक आजच्या आदिवासींप्रमाणे माकडे, झाडे, गिधाडे इत्यादींची पूजा करत. या कारणास्तव, विविध प्राण्यांची पूजा करणाऱ्या आदिवासींना वानर, ऋक्ष, जटायू, संपात्ति ही नावे मिळाली.
श्रेष्ठ हनुमान, सुग्रीव, रावणाला नाक घासायला लावणारा शक्तिशाली वाली, समुद्र बांधायला मुख्य मदत करणारे नल आणि नील, हनुमानाचा मुलगा मकरध्वज इत्यादी पराक्रमी वानर होते.

हनुमानाची आई अंजनी पूर्व जन्मात इंद्राच्या दरबारात अप्सरा होती. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदा त्यांनी आपल्या चंचलतेमुळे तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या ऋषीसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा ऋषीमुनीने रागात तिला शाप दिला की तू वानरीच्या रुपात आयुष्य जगशील.

वृषाकपी नावाचा वानर हा इंद्राचा मित्र असल्याची सुद्धा एक कथा आहे. त्याने इंद्राची पत्नी इंद्राणीची छेड काढली होती. परंतु तरीही इंद्र त्याची मैत्री सोडायला तयार नव्हता. काही तज्ञांनी वृषाकपि हे नर-वानर या शब्दाचे ऋग्वेदीय रूप असल्याचं सांगितले आहे. ऋग्वेदात सूर्यालाच वृषाकपी म्हणलेले आहे.

पुराणकाळात वानर माणसांप्रमाणे हुशार का होते?

बलराम आणि वानर द्विविधा यांची कथा:
श्रीमद्भागवद्पुराणातील दहाव्या स्कंधमध्ये बलराम आणि वानर द्विविधाची कथा आढळते. द्विविधा नावाचा वानर त्रेतायुगात, रामायण काळात सुग्रीवाचा मंत्री होता. हा खूप जुना वानर होता. तो नरकासुराचा मित्र होता ज्याचा वध श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी केला होता. आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी द्विविधाने ऋषीमुनींना त्रास दिला, लोकांना मारले आणि त्यांची संपत्ती नष्ट केली. त्याच्याकडे दहा हजार हत्तींचे बळ होते. तो पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांना गुहेत फेकून द्यायचा. बलराम एकदा अनर्त प्रदेशातील रैवतक पर्वतावर आला असता वानर द्विविधाने बलरामला पाहिले. द्विविधाने तेथे असलेल्या महिलांवर हल्ला केला तसेच बलरामचे वारूनी मद्याचे भांडे फोडले. त्यानंतर बलवान वानराने बलराम च्या अंगावर सालाचे झाड तोडून मारले. तेव्हा बलराम आणि द्विविधामध्ये युद्ध झाले. बलरामने द्विविधाला कुस्ती युद्धात ठार मारले आणि अनर्त प्रदेश त्याच्या दहशतीतून मुक्त झाला अशी कथा आहे.

भीमाचे गर्वहरण करणारा वानर:

पुराणकाळात वानर माणसांप्रमाणे हुशार का होते?

महाभारतात पांडव वनवासात असताना एका वानराने भीमाचे गर्वहरण केल्याची एक कथा आहे. कथेनुसार, भीमाला स्वतः च्या शक्तीवर अहंकार निर्माण झाला होता. गंधमादन पर्वतावर द्रौपदीसाठी कमळाची फुले आणायला गेलेल्या भीमाला वाटेत एक वृद्ध वानर दिसले. वानराचे शेपूट रस्त्यावर पसरले होते. वृद्ध वानराने भीमाला ते शेपूट उचलून बाजूला ठेवण्याची विनंती केली. अगदी सहज पणे हत्ती, बैल, सिंह उचलणाऱ्या भीमाला वानराचे शेपूट उचलता आले नाही म्हणून त्याला स्वतः ची लाज वाटली आणि त्याचे गर्वहरण झाले. ते वानर दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात हनुमान होता.

वानर बनवल्यामुळे नारदाने दिला होता विष्णूंना शाप:
देवांना प्रसन्न करण्यासाठी नारदांनी कठोर तपश्चर्या केली होती. तपश्र्चर्येत विघ्न आणण्यासाठी इंद्राने कामदेवाला पाठवले. परंतु एकदा महादेवाने कामदेवाचे शरीर जाळले होते. त्यामुळे कामदेवाचा नारदांवर काहीच परिणाम झाला नाही. कामदेव अयशस्वी झाले आहेत हे कळल्यावर नारदांना खूप आनंद झाला. त्यांनी कैलास, ब्रम्ह लोक सर्वत्र जाऊन कामदेवावर विजय मिळवल्याची बढाई मारली. ही बातमी सांगण्यासाठी ते विष्णूकडे गेले. तेव्हा विष्णूने त्यांना धडा शिकवायचे ठरवले. नारद विष्णूलोकातून परत येत असताना त्यांना एक राजकुमारी वराच्या शोधात आहे आणि तिच्यासाठी स्वयंवर आयोजित केल्याचे दिसले. देवांनी सांगितल्याप्रमाणे, कामदेवाने नारदांच्या हृदयात प्रवेश केला. नारद आता कामदेवाच्या ताब्यात होते. नारद राजकन्येच्या सौंदर्याने मोहित झाले आणि त्यांनी विष्णूंना विनंती केली की तिला स्वतःप्रमाणेच सुंदर बनवा. तेव्हा विष्णूंनी नारदांचेच संपूर्ण शरीर अतिशय सुंदर बनवले. परंतु त्यांचा चेहरा मात्र वानरासारखा बनवला. जेव्हा नारदांनी आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले तेव्हा त्यांना काय झाले ते समजले. मुलींमध्ये आणि दरबारी आपली मस्करी केली म्हणून रागाच्या भरात त्यांनी विष्णूला शाप दिला की आपल्या पत्नीच्या वियोगामुळे त्यांना त्रास होईल आणि त्यांना माकडांची मदत लागेल. हा शाप भगवान रामाच्या रूपात विष्णूच्या अवतारात खरा ठरला.

मर्कट शब्दाचा अर्थ:
मर्कट हे माकड शब्दाचं संस्कृत रूप असून ते गोंडी भाषेपासून तयार झालं आहे. 'मर्कट या शब्दात गोंडीतील 'मरा' म्हणजे वृक्ष आणि 'कईट' म्हणजे हात लावणे अशा शब्दांचा 'मराकईट' हा झाड हाताळणे असा त्याचा अर्थ होतो.

असे खूप संदर्भ आणि कथा वानरांशी निगडित आहेत. ते आपले वंशज होते आणि पुराणकाळात ते आजच्या मनुष्यासारखेच विकसित होते. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा.

454 

Share


N
Written by
Nandkumar Gawali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad