हरी थी, मन भरी थी,लाख मोती जडी थी |
राजाजी के बाग में,दुशाला ओढे खडी थी|
कच्चे पक्के बाल है उसके,मुखडा है सुहाना..
इचकं दाना...........,.
हे गाणं ऐकलं की नर्गिस आठवते आणि लताजींचा सुमधुर आवाज एक माहोल बनवतो. आठवलं ना गाणं.उत्तरही लक्षात आले असेलच. हो भुट्टा अर्थात मक्याचे कणिस.
मक्याचे कणिस आणि पाऊस यांचे मित्रत्वाचे नाते आहे.बघा स्वानुभव आठवा. पावसाळ्यात एखाद्या विकएंडला आपण वर्षासहलीला गेलो की मस्त आनंद लुटताना , एखाद्या हायवेवर थांबून रिमझिम पावसात नुकतेच भाजलेले,मस्त मसाला लावलेले गरम-गरम मक्याचे कणिस काय रंगत आणतं.नुसतं वाचूनही तोंडाला पाणी सुटले ना?
हे कणिस आइस्क्रीमसारखे असते. भरपेट जेवणानंतर ही चालते किंवा उपाशी असतानाही खायला मजा येते. याचे एक अजून वैशिष्ट्य म्हणजे यासोबत सुखद आठवणीच जोडलेल्या असतात.अगदी आपल्या घरात बसूनही मक्याचे कणीस खाण्याचा आनंद आपण लुटू शकतो.अर्थात एक पर्वणीचा अनुभव रिमझिम पाऊस,मित्रांची हासीमजाक आणि सोबतीला कणीस अहाहा......एक विलक्षण अनुभूती.