Bluepad | Bluepad
Bluepad
आषाढ वारी
Rupali Kardile
Rupali Kardile
22nd Jun, 2022

Share

विठ्ठल नामाचा । लागला रे ध्यास
तुझे भेटी आस। वारकऱ्या.।।
करुनी पेरणी ।निघालो वारीला।
सोडूनी हवाला । तूझेवरी.।।
सारेच भाविक ।पंढरीच्या वाटे।
नाम मुखावाटे ।सगळ्यांच्या.।।
नाही शिरकाव । अहंपणासही
तुळशीमाळ ही ।गळा शोभे.।।
डोईवर असे ।तुळस सुंदर।
ध्यान निरंतर ।सावळ्याचे.।।
ज्ञाना तुकोबांच्या ।पालख्या पंढरी।
करी वारकरी । नामघोष.।।
ज्ञाना तुका चोखा ।नामा नी सांवता
शिकवी समता ।भक्तगणा.।।
सारे चराचर । रोगमुक्त आता।
कर भगवंता । मागणे हें।।
रचनेचे काम। करून घेतले।
निमित्त मी झाले । भक्तीभावे.Il
🌸🌸🌸
रुपाली करडिले
आषाढ वारी

111 

Share


Rupali Kardile
Written by
Rupali Kardile

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad