वाढलेल्या तापमानामुळे संतप्त झालेल्या प्रत्येक व्यक्ती आभाळाकडे बघून पावसाची वाट बघत असतो. पावसाळ्याची सगळी तयारी जवळजवळ झालेली असते. पहिल्या पावसात आनंद लुटायला मुलं आतुरतेने वाट बघत असतात.
पावसाळा म्हणजे आठवते उन्हाळ्यात जय्यत तयारी केलेले पापड, लोणचे ,सांडगे मिरच्या इत्यादी. आणि भरपूर पाऊस पडायला लागल्या की मुलांच्या फर्माईशी प्रमाणे कांदा भजी, मिसळ इत्यादींची आस्वाद घेण्याची मजाच वेगळी असते.
साधारण दहा पंधरा दिवस झाले की निसर्ग सौंदर्य फुलून दिसायला लागतं. सगळीकडे हिरवेगार दृश्य...... वा किती सुंदर ना!!. मग मुलं हट्ट करायला लागतात .जावूया कुठेतरी फिरायला.
सगळ्यांची चर्चा झाली आणि ठरवलं समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जायचं. रिमझिम पाऊस पडत होता. तिथे पोहोचलो तेव्हा चार साडेचार वाजले असतील. लांबूनच दिसत होता सुंदर आभाळ, वरुणराजाचे गर्जन आणि समुद्राच्या लाटा, एकीकडे निसर्गसौंदर्य आणि दुसरीकडे मनातली भीती. पुढे जायला हिंमत होत नव्हती. सोबत आलेली मुले हट्ट करू लागली. रिमझिम बारीक पाऊस पडत होता. थोडसं ऊन ,आकाशात पाहिलं तर 🌈.
वेळ कसा गेला तो कळेना. मुले शिंपल्या गोळा करणेत धुंद झाली होती. पण आमच्या मनात काळजी होती. समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला असेच वाटत असतं.
पाण्यात खेळ म्हणजे मुलांच्या एक छंद. आमच्या मनात भीती होती ती येणाऱ्या लाटांची . तेव्हाच एक मूल जोराने ओरडू लागलं. बघितलं तर पायातून रक्त यायला लागलं होतं. काचेचा तुकडा कसे बाहेर काढायचं हेच एक मोठा प्रश्न होता. नाईलाजास्तव लवकरच परत निघावं लागलं. प्रवास म्हटलं की थोडीशी प्रथमोपचाराची तयारी असावी लागते.
तिथेच थोडासा अंतरावर असलेल्या टपरीवर ती गर्दी दिसत होती तेव्हा आमच्या लक्ष तिकडे गेलं. गरमागरम चहा आणि कांदा भजी, मक्याचं कणीस आस्वाद घेतल्यानंतर मुलगी सावरली.
लोक प्रवास करताना असे का विचारत करत नाही? प्लास्टिक वस्तू, बाटल्या वापरून कुठेही फेकून देतात. हे बरोबर आहे का? तिथे फेकून दिलेला कचरा पाहून मनात वाईट वाटायला लागल. परतीच्या प्रवासात मुलांनी आम्हाला भरपूर प्रश्न विचारले.
आज-काल शाळेत सुद्धा ह्या गोष्टी शिकवला जात नाही असं नाही. वाढलेल्या प्रदूषण आणि पर्यावरणावर याचा परिणामही दिसू लागले.
मुलांना समजावणं सोपं असतं. काही गोष्टी त्यांना पटतात. पण हे समजवायचा कोणी.?सहलीला किंवा प्रवासात जाताना पर्यावरणाला हानी होईल असे काही करू नये याची काळजी प्रत्येकाने घेतला पाहिजे. गाडीवरून प्रवास करत असताना कचरा बाहेर इकडेतिकडे फेकून देणे हे अत्यंत मूर्खपणा आणि निषेधार्ह वागणूक आहे .इकडे तिकडे नजर फिरवली तर, गटार सगळी कचऱ्याने भरलेली असतात. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देणे बरोबर आहे का? असे विचार करत असतानाच गाडी पटकन थांबली. समोर रस्त्यावर पाणी. आता कसे घरी परतायचं ?हाच एक मोठा प्रश्न होता. थोडासा तरी पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी काय कधीकधी रस्ते आणि पूल सुद्धा वाहून जातात. शेवटी त्या दिवशी निसर्गसौंदर्याच्या आनंद लुटला खरं. मुलांना पर्यावरणाचा संरक्षणाबद्दल जाणीवही झाली. चांगले धडेही मिळाले.
पाणी रस्त्यावरून ओसरल्यावर, पुढे प्रवास करून घरी पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते.