Bluepadकविता
Bluepad

कविता

श्री. दत्ताराम बापू लाड ऊर्फ मंगेश
श्री. दत्ताराम बापू लाड ऊर्फ मंगेश
13th Jun, 2020

Share

पुन्हा येईन.....!

येई सरीवर सर, होई सुखद अचल;
जल पडताची पत्रे, खेळी टिप-यांची सहल.
मस्करी तरूशी, करू लागला पवन;
जसे माऊलीशी खेळे, तिचे गोजिरे नंदन......

बिजली गरजे, जणू क्रोधाचा असूर;
अवनीवरील विहार, तिला नसेल फिकीर.
वल्लरीवरचे कुसुम, किंचित गंधाने हसले;
जसे ययाती-शर्मिष्ठा दोघे प्रथम भेटले......

सारी सृष्टी डौलाने, दाखवू लागली साज;
तरू, उपवन - द्विज, सारे झाले सतेज.
झाली धरणी देखणी, गेले आनंदात घन;
गेले आनंदात घन, सांगुनी पुन्हा येईन.....
सांगुनी पुन्हा येईन....

✍....दत्ताराम बापू लाड
ऊर्फ मंगेश 9870139947

1 

Share


श्री. दत्ताराम बापू लाड ऊर्फ मंगेश
Written by
श्री. दत्ताराम बापू लाड ऊर्फ मंगेश

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad