Bluepadमहामारी, महामंदि, ते मॅकडाॅनल्डस्.
Bluepad

महामारी, महामंदि, ते मॅकडाॅनल्डस्.

M
Manish surve
29th Nov, 2021

Share

महामारी, महामंदि, ते मॅकडाॅनल्डस्.
शतकापुर्वी आणि आज.


फॅक्टरी बंद पडल्यामुळे वडीलांचा रोजगार गेला. कुटूंब आर्थीक संकटात सापडले.त्यामधून सुटका करुन घेण्यासाठी दोन भावांनी घर सोडले. मीळेल ते काम करायला सुरवात केली. त्यासोबतच शोध सुरु झाला वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण होणार्‍या संधीचा. कधी चित्रपटाचे सेट्स ऊभे करणे, तर कधी भाडेतत्वावर सिनेमा गृह चालवने.परंतू म्हणाव तस यश कधीच हाती लागलं नाही. तरीही ना खचले, ना घाबरले, ना थांबले. अपयशी प्रयोगाच्या पायर्‍या चढता चढता एक प्रयोग असा केला, ज्याने दोघांचे आयुष्य तर बदललेच, पैसाही चिक्कार मिळाला. आणि नाव तर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचले.
गोष्ट आहे साधारण 100 वर्षापुर्वीची. अमेरीकेतील न्यु हम्पशायर येथील दोन बंधू रिचर्ड आणि माॅरीस. सन 1920 नंतर जगावर आर्थीक मंदी आली.फॅक्टरी, कारखाने बंद पडले. उद्योग, व्यवसाय बुडाले. परीणामी लोकांचे रोजगार, नौकर्‍या गेल्या. रोजगार मिळवीन्या साठी लोकांचे स्थलांतर सुरु झाले. रिचर्ड आणि माॅरीस यांनी कामाच्या शोधात कॅलिफोर्नीयाकडे स्थलांतरण केले. मायानगरी कॅलिफोर्नीया म्हणजे अमेरीकेतील एक समृद्ध व संपन्न राज्य. दोघांनी नशीब अजमायला न्पु हम्पशायर ते कॅलिफोर्नीया प्रवास केला. मिळेलते काम करत, नविन संधी शोधू लागले. नशीब अजमावुन पाहीले आणि अपयशाचा पाढा वाढतच होता. त्याच काळात रेस्टाॅरंट क्षेत्रात नवनव्या कल्पना रुजत होत्या. त्यापैकी एक म्हणजे 'ड्राईव्ह ईन्स्'. म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या खाद्यपदार्थाची order देवून ती गाडीमध्ये मीळवून खायचे. गाडीपर्यंत पदार्थ पोहचवण्यासाठी रेस्टाॅरंटचा स्टाफ कार्यरत असायचा.

अत्यंत लोकप्रीय झालेल्याया नाविन्यपुर्ण क्षेत्राकडे या अवलीयांचे लक्ष गेले. व आणखी एक प्रयोग करण्याचा निर्णय झाला. 1937 ला प्रायोगीक ड्राईव्ह ईँन्स् रेस्टाॅरंट आणि 1940 ला पहीले स्वातंत्र व मोठे रेस्टाॅरंट 'सर बरनॅडीनो' येथे उघडले. आणि सुरवात झाली एका अलौकीक पर्वाची. हे पर्व म्हणजे फास्ट फुडचा पाया रोवणारे मॅकडोनल्डस्.
मॅकडोनल्डस् बंधूनी आपल्या व्यवसायात नाविन्यपुर्ण प्रयोग केले. त्रुटी शोधुन काढल्या. त्यावर मात केली. शीस्त व स्वच्छता, जलद सेवा व कमी कींमत, संक्षिप्त व सक्षम मेनू याबाबत कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसला व वाढु लागला. व्यवसाय तेजीत आला. रेस्टाॅरंट समोर लोकांच्या मैलभर रांगा लागत होत्या. परंतू हे सगळ स्थानीक पातळीवरच होत. अजून त्याला ग्लोबली ओळख नव्हती. तेंव्हाच त्यांचा संबंध रे क्राॅक या कलंदर व्यावसा माणसोबत आला. त्याने मॅकडोनल्डस् ला जागतीक पातळीवर नेण्याचा प्रस्ताव बंधूंसमोर मांडला. त्यांनी तो मंजुर केला. त्यानूसार करार झाला. रे क्राॅकची व्यावसायीक बुध्दी आणि अथक प्रयत्नांनी मॅकडोनल्डस् ला जागतीक पातळीवर नेले. यातूनच फास्ट फुड ईंडस्ट्री चैन तयार झाली. आणि मॅकडोनल्डसने फिनीक्स् भरारी घेतली.
या व्यवसायाची सुरवात आर्थीक महामंदिच्या पार्श्वभुमीवर झाली होती. एकीकडे कारखाणे उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढत होती. लोकं आर्थीक संकटात सापडले होते. तर दुसरीकडे मॅकडोनल्डस् बंधुंंनी नाविन्यपुर्ण क्षेत्राचा शोध घेत आपला व्यवसाय ऊभा केला. व रे क्राॅकने तो जगाच्या कानाकोपर्‍यात पोचवला. हेसर्व तेंव्हा घडत होते जेंव्हा जग दुसरे महायुध्द आणि सर्वात मोठ्या आर्थीक मंदीतून सावरत होते.
शतकापुर्वी सुरु झालेला मॅकडोनल्डस् प्रवासाचा ताळेबंद आपल्या सद्याच्या परस्थीतीला लागू पडणारा आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाण आधीच खुप मोठे असून कोरोना संकटाने त्याला शिखरावर पोहचवले आहे. व्यवसाय बंद पडले, नौकर्‍या गेल्या, नविन रोजगार निर्मीती थांबली. रोजगारच नसल्याने लोकांजवळ पैसा नाही. त्यामुळे चैनीच्या वस्तुंचा खप कमी होवुन, मागणी घटेल. कारखाण्यातील ऊत्पादन कमी कराव लागेल किंवा ते बंद पडतील. त्यामूळे नौकर्‍या जातील. परीणामी चैनीच्या वस्तूवरचा खर्चात पुन्हा कपात. हे एकप्रकारचे दृष्टचक्र निर्माण होईल. मात्र अशा परीस्थीतीत ज्याप्रमाणे ऊद्योग व्यवसाय बंद पडतात त्याचप्रमाणे नव्या संधी नीर्माणही होतात. हेही लक्षात घ्यायला हवे. मॅकडोनल्डसचे ऊदाहरण यासाठी समर्पक असे आहे.


तज्ञांच्या मते देशावर आधीच आर्थीक मंदिचे सावट होते. त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे त्याची तीव्रता आणखी वाढणार. परंतू संकटांनी खचुन न जाता, अडचणींवर मात करत त्याचं संधीत रुपांतर करुन नव्या वाटा शोधाव्या लागताल. तरच आपल्याकडेही महामारी आणि महामंदीतून निर्माण होवू शकतील अनेक मॅकडोनल्डस्.

वाचा आणि कमेंट करा.
https://manishsurve9696.blogspot.com/2020/06/blog-post_12.html

19 

Share


M
Written by
Manish surve

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad