समर्था तुला पाहणे माझा ध्यास आहे,
तुझ्या नामस्मरणाचा हव्यास आहे,
तू माझा व्यास आहे, मी तुझा दास आहे //
होतो मी अज्ञानात जगात,
ना पाप पुण्यांचा हिशोब बघत,
तुझी भेट व्हावी कस आलं मनात.
तू माझा व्यास आहे, मी तुझा दास आहे //
तुझ्या दर्शनाचा लाभ योगियांचा योग,
तुझ्या स्पर्शाने सरले जीवनाचे भोग,
विषय वासनेचे सगळे सुटतील रोग.
तू माझा व्यास आहे, मी तुझा दास आहे //
एकदा जो गेला शरण, फिटले त्याचे सारे ऋण,
दोष सगळे जाती, "जैसे आग लागता जळे तृण,
त्यांचे निरूपण ऐकता, येतील सगळे चांगले गुण.
तू माझा व्यास आहे, मी तुझा दास आहे //