Bluepadगुरु देव दत्त
Bluepad

गुरु देव दत्त

रवींद्र
रवींद्र
13th Jun, 2020

Share

हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //
या विश्वाचा तूच स्वामी,
मन हे विरले तुझ्याच नामी,
काम क्रोध हे झाले निकामी.
हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //
आठवतो मी चित्ती ध्यानी,
रूप तुझे हे कांतीवाणी,
अहंकारचे झाले पाणी.
हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //
भय भीतीचे होते डोंगर,
चिंता उद्वेगाचे झाले सागर,
तुझ्या पुढे ते भरती घागर.
हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //
माया ममता आह्मी जोडतो,
कुकर्माने धन ओढतो,
ह्या सगळ्यातून तूच सोडवितो.
हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //
बालपणी केली करमणूक,
किशोर अवस्थेत फसवणूक,
वृद्धपणी नाही जपणूक.
हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //
तुझ्या नामाची लागली प्रित,
तुझ्या चरणी लागले चित्त,
सद्गुरूंचे हे उपकार अपरिमित.
हृदयस्थ नारायणा श्री दत्तात्रेया //


0 

Share


रवींद्र
Written by
रवींद्र

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad