Bluepad | Bluepad
Bluepad
उदासिनता....
sanket kulkarni
sanket kulkarni
12th Jun, 2020

Share


अतृप्त मन, उदासीन मन
चिंतेची रांग एका मागोमाग

कसली नाती कसली गोती
नाही पडली, कुणालाचं कुणाची

आस्थेने विचारील दुनिया सारी
गुंतेल कामात, कुत्छित हासूनी

आहे मी सोबत तुझ्या, हेच देती आश्र्वासन
फिरवून पाठ म्हणती,चु...आहे का हा??

अहो! समजवून झालं सांगून थकलो
थकलो,आता या दुनियाला!

खूप झाली उदाहरण, खूप झाल्या उपमा
नाही समजतं कोण, भावना मनातल्या

खरचं...,
राहीलो एकटा, पडलोय एकटा!!
कर्तुत्व शुन्य, फाट्यावर मारते दुनिया

खूप भरुन आलंय मन, कसं करु मोकळं??
गुदमरतो जीव आतल्याआत
आसवांनी शोधला मार्ग बाहेरचा

गंमत झाली ए माझी
जवळचं नाही, हक्काचा खांदा

नाही पाठीवर हात प्रेमाचा
नाही कुरवाळी हात प्रेमाचा
आता खरचं एकटं वाटतंय!!

नाही इच्छा,आता या जगण्याला
दुर्लक्ष करतोय, हाक मारतोय मरणाला

© संकेत कुलकर्णी

9 

Share


sanket kulkarni
Written by
sanket kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad