Bluepad | Bluepad
Bluepad
मरण अटळचं आहे...!

Hemant Dinkar Sawale
Hemant Dinkar Sawale
12th Jun, 2020

Share

#मरण_अटळचं_आहे...!
हे कसलं आहे धूसर जग
आॅक्सीजनही झाला आहे भेसळयुक्त
चिमण्यातर केव्हाच्याचं मरुन पडल्यात
चामडीवर पडलीय काजळी आणि
चरबीही वितळत आहे दिवसागणिक
अंगातून वाहत आहे घामाचा सुकाळ
आणि ओल आटून जात आहे खोलवर
मनाची आणि मातीतील
आभाळभर वाढलेल्या बापाला संपवलं
तिथेचं पुरल्या विषारी लोभाच्या बीया
ते रोपटं फोफावलं आसमंतात
त्याने घट्ट केलीत मुळं
हे सारं घडत असताना
नुसतं बघणं असतं सोपं
कोणी विचारले याचे कारण तर
सांगुन टाकावी मरणाची भीती
ढकलावेत दिवस एका मागोमाग
जगत राहावे कुठलाही प्रश्न न विचारता
असंही, मरण अटळचं आहे...!

#हेमंत_दिनकर_सावळे...!

8 

Share


Hemant Dinkar Sawale
Written by
Hemant Dinkar Sawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad