Bluepadलॉकडाउन मध्ये वेब सिरीज चा धडाका !
Bluepad

लॉकडाउन मध्ये वेब सिरीज चा धडाका !

v
vishal rajendra arade
17th Apr, 2020

Share

लॉकडाउन मध्ये सर्वांसमोर रोज एकच प्रश्न उभा राहतो , तो म्हणजे आजचा दिवस घालायचा कसा ? परंतु हा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे . कारण मोबाईलवर वेब सिरीज ने धुमाकूळ घातला आहे . त्याच त्या आशयाचे चित्रपट , टीव्हीवरील त्याच कंटाळवाण्या सासू सुनेच्या मालिका या ऐवजी वेब सिरीज मध्ये नवीन विषय , बेधडक कथानक असल्याने ते नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाउन लागू असताना सर्वजण आपापल्या घरात बसून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत , आशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या परीने कुटुंबासोबत वेळ घालवत आहे . काही जण फेसबुक च्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत , तर काही जण दिवसभर टीव्हीसमोर बसलेले पाहायला मिळत आहेत . परंतु यातील बरेच मोबाइलधारक नवनवीन वेब सिरीज पाहण्यात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे .
गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजने धमाल उडवली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वेब सिरीजमध्ये कथानकसोबत नवनवीन प्रयोग होत आहेत , नवनवीन विषय प्रेक्षकांना अनुभयास मिळत आहेत. टिव्ही मालिकांमधील सासू-सुनेचा बोअरिंग ड्रामा तसेच दीर्घ ब्रेक येथे नसतो .
कोणतेही भन्नाट कथानक घेऊन एचडी क्वालिटीसह या वेब सिरीजमध्ये ८ ते १० एपिसोड असतात . प्रत्येक एपिसोड 25 ते 45 मिनीटापर्यंत असतात . या वेब सिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर बऱ्याचदा एकाच वेळी लॉन्च केल्या जातात , तर काही वेळेस दर आठवड्याला एक एपिसोड लॉन्च केला जातो . कोणतीही सेन्सॉरशिप नसलेल्या या वेब सेरीजमध्ये आता आघाडीच्या नायक नायिका उतरू लागल्या आहेत . खासकरून तरुणांना या वेब सिरीज ने भुरळ घातली आहे . सध्या अनेक निर्माते , दिग्दर्शक चित्रपटांच्या ऐवजी वेब सिरीज बनवण्याला पसंती देत आहेत . चित्रपटगृहे बंद असल्याने वेब सिरीज दिग्दर्शकांसाठी आधार ठरत आहेत. नेटफ्लिक्स , अमेझॉन प्राईम , व्हुट , हॉटस्टार , एमएक्स प्लेअर , यासारख्या अनेक अँप्सवर या वेब सिरीज लॉन्च होत आहेत .

*अक्षय आरडे*
*विद्यार्थी*
*8208910410*

1 

Share


v
Written by
vishal rajendra arade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad