Bluepad | Bluepad
Bluepad
Comperison - तुलना
M
Mahesh joshi
17th Apr, 2020

Share

#स्वलेखन


याच्या पेक्षा तो चांगला त्या पेक्षा हे चांगलं माझ्या पेक्षा त्याची life best आहे, त्याला सगळ्या गोष्टी माझ्या अगोदर भेटल्या किंवा माझ्या पेक्षा चांगल्या आहेत.
हे आपण जेंव्हा बोलतो त्या वेळी आपण त्या दुसऱ्याचा हेवा तर करतोच पण आपलं खच्चीकरण करून घेतो.

आपण जे आहोत त्याचा स्वीकार करायला शिका, Motivation च्या नादात आणि दुसर्यासोबत केलेल्या तुलनेत आपण स्वतःला गमावून देतो.
Simple फंडा आहे तुम्ही जे आयुष्य जगत आहेत ते तुमचं आहे त्यावर तुम्हाला दुसऱ्याची छाप असण्याची काही एक गरज नाही.

आपल्या मित्रा कडे Iphone आहे म्हणून मला पण Iphone पाहिजे हे कितपत योग्य आहे? तुमच्या कडे असलेल्या कित्येक गोष्टी कदाचित त्या मित्रा कडे नसतील, आणि Iphone किंवा दुसऱ्या कुठल्या Materiliest गोष्टी च आपल जीवन आहेत का?

मला मुळात तुलना करणे पसंदच नाही कारण जो तो त्याच्या आयुष्यतले 24 तास त्याच्या परीने जगतो, आज तुम्ही जिथे आहेत त्याला तुमचा भूतकाळ जबाबदार आहे तुमचं भूतकाळ आणि मित्रा चा भूतकाळ सारखा आहे का? एखाद्या कडे वडिलोपार्जित संपत्ती असते त्यामुळे तो व्यक्ती वर्तमानात आपल्या पेक्षा चांगलं आयुष्य जगत असेल पण तुमच्या आमच्या कडे वडिलोपार्जित संपत्ती नाही मग आपण ती जमवण्यात व्यस्त पाहिजे ना की दुसऱ्या सोबत तुलना करण्यामध्ये.

तुम्ही एकाच वर्षी Degree घेऊन कॉलेज मधून बाहेर पडला असाल पण प्रत्येकाला सारख यश मिळाले नाही, कोण Canada ला जॉब करत असेल, कोण business करत असेल एखादा चांगल्या post वर job ला असेल कोणाच लग्न होऊन संसारात मग्न असेल आणि कुणी आणखी पण job शोधत असेल.
या सगळ्यांची तुलना होऊ शकते का? नाही,
कारण तुलना करताना सर्व गोष्टी समान असायला हव्यात पण इथे फक्त degree सारखी आहे त्यात पण मार्क वेगवेगळे आणि प्रत्येकाचा भूतकाळ, कारण जो Canada ला जॉब करतोय तो कदाचित English medium चा असेल! Business वाला rich kid असेल अश्या बऱ्याच बाबी आपल्या वर्तमान परिस्थिती च्या मागे असतात पण तुलना करत असताना आपण फक्त वर्तमान विचारात घेतो आणि स्वतःला दोष देत जगतो.

सचिन तेंडुलकर ने वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं आणि क्रिकेट चा देव बनला त्या साठी त्याला 22 वर्ष खेळावं लागलं, आणि तेच ऑस्ट्रेलिया च्या Michel Hussey ने वयाच्या 30व्या वर्षी क्रिकेट मध्ये पदार्पण केले आणि 36व्या वर्षी निवृत्ती घेतली पण त्या 6 वर्षात तो Mr. Cricket म्हणून ओळखला जाऊ लागला.
Hussey ने 16व्या वर्षी पदार्पण झालं नाही म्हणून सचिन सोबत तुलना करत बसला असता तर 30व्या वर्षी पदर्पण करण्यासाठी जिद्द उरली नसती. तो comperison पेक्षा स्वतःला Groom करण्यात व्यस्त राहिला म्हणून तर 6 वर्षातच वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं त्याला.

बुद्धिबळ चा पाट म्हणजे ही सृष्टी आहे ज्या मध्ये कुणी प्यादी आहे कोण वजीर तर कोण घोडा, प्रत्येकाला वेगवेगळे अस्तित्व आहे, उंट उभ्या रेषेत किती ही घर चालतो म्हणून काय प्यादी ने पण असा हट्ट धरावा का? आणि त्यामुळे उंट भारी ठरतो का? कारण उंट मेला तर प्यादी त्याला जिवंत करण्याची ताकद ठेवते.
आणि घोडा अडीच घर जास्त चालला म्हणून काय वजीर होतो का?

कोणाचा ही दिवस असतो कदाचित आज तुमच्या कडे अंधार असेल पण उद्या सूर्य उगवणार आहे कायम अंधार कधीच नसतो आणि अंधारात पण चंद्र असतोच ना हो? तो पण प्रकाश द्यायचं काम करतोच मग का त्या सुर्याचीच वाट पाहायचं? आणि दुसरीकडे असलेल्या सूर्या चा हेवा करायचा?
चंद्रा च्या पौर्णिमा चा प्रकाश पण अंधार मिटवतोच ना? कारण हे सगळं अंधार घालवण्यासाठी च तर चालू आहे.

तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करा, तुमच्या भूतकाळा ची वर्तमाना सोबत करा.

"रात की मुठ्ठी में एक सुभह भी है,
शर्त यह है की पहले जी भर के अंधेरा तो देख लो"
गुलजार

#Besafe #StayatHome

20 

Share


M
Written by
Mahesh joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad