जाळूनी टाकूया जुन्या भावना आणि जुने मन
जगायचे राहून गेलेले जगूया नव्याने ते क्षण.
पांढरेशुभ्र असे आकाश आणि फिरुया तो गगन
जुन्या आठवणी मिसळून मातीत स्वाद घेऊ तो कण कण.
जुनी नाती विसरुनी नवी जोडूया
सुटलेला हात हातातून आता सोडुया.
प्रेमात पडूया आपली काळजी घेणाराच्या
घेऊया त्यांना मिठीत दुःखात साथ देणाराच्या.
अबोल असणाराच्या गर्दीतून आता बाहेर येऊया
बोलक्या निखळ अशा सत्येत्येच्या रांगेत उभे राहूया.
खोट्या नाटकांचे इथे खूप बाजार भरतात
खऱ्या आजाराचे कोण कुठे वाली भेटतात.
नको आता जुने विचार
कशासाठी व्हावं लाचार.
उसवळेल्या कापडाचे कुठे तंतोतंत धागे जुळतात
जुन्या भावना आणि जुने मन सांगा कुठे एकनिष्ठ राहतात.
जाळुनी टाकूया जुन्या भावना आणि जुने मन
जगायचे राहून गेलेले जगूया नव्याने ते क्षण.
महेश ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️