तेलंगणाच्या पवित्र भुमित साकारतोय प्रति भगवान गड
भगवान गड म्हणजे देशाच्या पटलावरील एकविसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाचं शक्ती केंद्र , स्त्रोत बहुजन समाजाच हक्काचं ,ज्ञानपीठ , राष्ट्र संत भगवान बाबा यांचा भक्ती मार्ग , कर्म मार्ग,ज्ञान मार्ग तसेच आध्यत्मिक आणि संस्कृती कार्य तसेच महाराष्ट्रासह देशाला उर्जा प्रेरणा देणारं आहे. भक्ती-शक्तीच केंद्र असलेला महाराष्ट्र राज्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडीच्या बाजूला डोंगर माथ्यावर विस्तारलेला भव्य-दिव्य असा भगवान गड सज्जनांची किर्ती वार्या हाती माप या उक्तीप्रमाणे प्रमाणे आज तेलंगणाच्या पवित्र भुमित आदीलाबाद जिल्ह्यातील इचोड तालुक्यातील माधापुर गावाच्या डोंगर माथ्यावर ज्या पवित्र स्थळी कुठे त्रेतायुगात प्रभु श्रीराम चंद्र यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही भुमी तसेच कुलदैवत रेणुकामाता ज्या डोंगरावर विराजमान आहेत तसेच महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, राष्ट्र संत भगवानबाबा असे संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले अशा याच रांगेतील दख्खनचा हा पवित्र प्रदेश आणि याच ठिकाणी सोळा एकर जागेत राष्ट्र संत जगद्गुरु शांती ब्रह्म भगवान बाबा यांच्या मुर्ति ची प्राण प्रतिष्ठा समाजसेवक अणि एक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते संस्थाचालक अशी स्व कर्तुत्वावर महाराष्ट्रात आणि तेलंगणात आपली ओळख निर्माण करणारे महान नेतृत्व समाज भुषण तथा वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मा. प्रा बिभीषण पाळवदे सर यांच्या अथक परिश्रमाने समाज भुषण बालाजी उर्फ बंटी फड , साप्ताहिक वंजारी पुकारचे संपादक समाजभूषण दता जायभायेजी यांच्या विचारविनिमयाने आणि तेलंगणातील समाज बांधव तसेच प्रति भगवान गड ट्रस्ट माधापुर चे संस्थापक व समाज सेवक सुर्यकांत जी गिते व त्यांचे सहकारी यांच्या अथक परिश्रमाने दिनांक 14/5/2022/ रोजी गुरुवर्य ह.भ.प ब्रह्मनिषठ सद्गुरुनारायण महाराज माधापुर अनेक महान असे संत महंत व विधानपरिषद सदस्य नाशिक मा नरेंद्र दराडे जी तेलगांणातील स्थानिक आमदार राठोड साहेब , विनोद जी वाघ प्रदेश प्रवक्ते भाजपा महाराष्ट्र पांढरकवडा माजी नगराध्यक्ष मा शंकरराव बडे, तेलंगणा वंजारी समाज अध्यक्ष व्यंकटेश मुंडे , वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक गणेश खाडे, माधापुर चे सरपंच शेख तसेच हजारोंच्या संख्येने भक्त गण उपस्थित होते आणि सर्व मान्यवर व उपस्थित संत मंहत व भाविक भक्त यांच्या उपस्थितीत तेलगांणाचया पवित्र भुमित भव्य दिव्य स्वरूपात प्रति भगवान गडाची मुहूर्त मेढा रोवली आहे लवकरच वटवृक्ष होईल .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक
मार्गदर्शक 9011634301