Bluepad | Bluepad
Bluepad
मी छत्री बोलतेय... ☂️☂️☂️
Komal kailas mali
Komal kailas mali
15th May, 2022

Share

मी छत्री बोलतेय... ☂️☂️☂️
मी एक छत्री बोलत आहे☂️☂️.माझा उपयोग पावसाळ्याच्या🌧🌧 दिवसांत खुप मोठ्या प्रमाणात केला जातो .पावसाळ्यात मी पडणाऱ्या पावसापासून तुमचे रक्षण करते.☔☔ या शिवाय आजकाल उन्हाळ्यातही माझा उपयोग केला जातो . उन्हाळ्यात तीव्र उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी मला वापरले जाते.⛱️⛱️
पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी अडवून मी बाजुला टाकते.⛱️⛱️ या शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात सूर्याचे ऊन शरीरावर पडण्यापासूनही मी तुमचे संरक्षण करते.⛱️⛱️ परंतु माझा उपयोग जास्त करून पावसाळ्यातच केला जातो. पावसाच्या दिवसात तुम्ही मला आजुबाजुला सहज पाहु शकता. पावसाळ्याच्या या दिवसात मी खूप उपयोगी वस्तू बनून जाते. या दिवसामध्ये माझी खूप काळजी घेतली जाते. मला प्रेम आणि सन्मानाने ठेवले जाते. 😊😊
मला आशा आहे की आज माझे जसे अस्तित्व आहे, तसेच भविष्यातही राहील. माझा जन्म मानवजातीच्या सेवेसाठी झाला आहे व माझे कर्तव्य करण्यात मला अत्यंत आनंद आहे.

169 

Share


Komal kailas mali
Written by
Komal kailas mali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad