Bluepad | Bluepad
Bluepad
भटकंती प्राणीविश्वातुन
Kiran Sarjine
Kiran Sarjine
15th May, 2022

Share

मित्रांनो आज आपण चमच्याला भेटणार आहोत. काय? चमच्याला भेटायचम मग किचनमध्ये भांड्यात सापडल कि.त्यासाठी ईथे भेटायची काय गरज.
मला वाटलच तुम्ही गोंधळात पडलात ते. अरे मी किचनमधील भांड्याविषयी बोलत नाहीये तर पक्षाविषयी बोलत आहे. काय? अजुन ही गोंधळलात 🥄 आणि तो ही पक्षी?
मग हा लेख खास तुमच्यासाठी. मुळातच याची चोच चमच्यासायखी असल्याने ह्याला हे नाव पडल. म्हणुन काही ह्याचा संबंध चमच्यागिरीशी अजिबात नाही.
हा बदकापेक्षा मोठा पक्षी असुन पाय काळ्या रंगाचे असतात. तसेच चोचही काळ्या रंगाची असते. फक्त टोक पिवळ्या रंगाचे असते. एरवी नर आणि मादी एकसारखे दिसतात फक्त विणीच्या काळात नराला शेंडी येते आणि गळ्याखलिल भाग पिवळा होतो.
हे प्राणी एकटे किंवा थव्याने राहतात. यांचे प्रमुख खाद्य बेडुक,किटक, पाणवनस्पती, खेकडे, मासोळ्या किंवा गोगलगाय. यांची शिकार करायची पद्धत एकदम वेगळी आहे. हे त्यांच्या चोचीने पाणी ढवळून काढतात. त्यामुळे भरकटलेली जलचर सहज पकडता येतात.
हा भारत,पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश व म्यानमारमध्ये आढळतो.
भटकंती प्राणीविश्वातुन

176 

Share


Kiran Sarjine
Written by
Kiran Sarjine

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad