Bluepad | Bluepad
Bluepad
कौतुक सोहळा
2598
2598
15th May, 2022

Share

*कौतुक सोहळा*
भाग पहीला
मुंबईतील एक प्रशस्त हाँल माणसांनी खच्चून भरलेला होता...
काही -लोकांनी तर बसायला आसन नसल्याने मधल्या पँसेज मधे बैठक मारलेली होती..
आज होवू घातलेल्या कौतुक सोहळ्याचे क्षण हे काहींच्या मते अविस्मरणीय व डोळ्यांचे पारणे फेडणारेे असल्या कारणाने उच्च ईभ्रतीमधले सफेद कापडातील सूटबूटधारी व्याक्तींची वर्णी सर्वात पूढे लावण्यात आलेली..
त्या खालोखाल प्रत्येकाला त्याच्या योग्यते नुसार आसनास्थ करण्यात आल्याने, कष्टकरी माणसांनी मात्र जागा मिळेल तिथे बैठक मारलेली होती..
'कष्टाच्या भाकरी सोबत कष्टाच्या कमाईतला चौथा हिस्सा का होईना आपल्या सारख्या पण उपाशी असना-या माणसांच्या ओठी घास घालायला मागे न पहाणारी मंडळींची संख्या मात्र जास्त होती..
प्रत्येकाच्या डोळ्याची बाहूली फक्त समोर असणाऱ्या भव्य रोषनाईच्या झगमगाट करणाऱ्या स्टेजकडे होती..
काही क्षणाच्या विलंबा नंतर स्टेजचा पडदा वर सरकत वर वर जाणारा ..होता..
या कार्यक्रमाची उत्सव मुर्ती आरती भोसले , येणार होत्या..त्याचं स्वागत कडकडून होनारे होते .शिवाय त्यानी स्वरचित रेखाटलेल पुस्तक पूर्ण जगात जादू सारखे फीरले त्यातल्या संघर्ष कथानकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यास नवल नव्हते..
काही संधी साधू उच्च कोटीच्या निर्मत्यानी मात्र ह्या पुस्तकातून खुप घबाड कसं कमवता येईल याचा मानस बांधूनच या कौतुक सोहळ्यात हजर होते..
परंतू या सर्वाला अपवाद असणारा एक छोट्या टीव्हीवर नावजलेला कलाकार 'वनश्री सागर' याने हा कार्यक्रम केवळ निस्वार्थपणे आयेजीत केला होता..
आरतीचा संघंर्ष त्याने डोळ्यानी पाहीला होता.. तीच्या स्वलिखीत पुस्तकाची कथा जेवढी भावूक होती त्याही पेक्षा ती संघर्षाने तप्त होवून प्रेममय काव्या सहीत सुकुमारी आणि सुकुमार यांच्या प्रेमातून उत्कंटा क्षणाक्षणा शिगेला पोहचलेली..ही कांदबरी खुपच गाजत असताना आपण आरतीच्या कौतुक सोहळ्याचा प्रथम मानकरी व्हावें हीच एकमेव ईच्छा मनात धरून असलेल्या वनश्रीने हा घाट पदरमोड करूण घातला होता..
आजच्या कार्यक्रमात हजर राहणारी प्रत्येक व्याक्ती ही व्यावसाईक धोरण मनात हेरून आलेली...
परंतू त्याला अपवाद मात्र गरीब वर्ग होता..
त्याना फक्त करूनामाई सुख सागर,आरती (दीदी)यांचे दर्शन व्हावे म्हणून आलेली मंडळीच फारमोठ्या प्रमात होती..
"कार्यक्रमाची वेळ जवळ आली तशी सर्व मंडळी स्टेजवरचा पडदा कधी बाजूला सरकतो या प्रतिक्षेत असताना
पडदा वर गेला प्रत्येकाची नजर स्टेजवर स्थिरावली...
माईकचा ताबा मिळवून आधीच तीथे असलेला एक तरूण पूढे येत म्हणाला..
""आजच्या सत्कार सोहळ्यास हजर असना-या प्रत्येकांचे मनापासून स्वागत आहे..
याठीकाणी आज सपंन्न होणाऱ्या कौतुक सोहळ्याच्या मानकरी आरती भोसले थोड्याच अवधीत आपल्यात हजर असतील..आणि हा सोहळ्याची रंगत बहारदार होईल..
मला माहीत आहे आपले लक्ष या सोहळ्याच्या कौतुक मानकरी यांच्या येण्याकडे आहेत..
त्या येतीलच..त्या पूर्वी या कार्य्रमाचे आयोजक,व स्वागतक वनश्री सागर ईथे हजर आहेत त्यांच स्वागत आपण टाळ्या वाजवून करायचं आहे...
वनर्शी सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे..
आपण या व्यासपिठावर येवून आसनास्थ व्हावे..
या वर टाळ्यांचा कडकडाट जेवढा जोशात झाला तेवढ्या जोशात तो थांबलाही..
पूढे काही तरी बोलायचं म्हणून तो तरूण बोलला
माझे नाव निमेश निंबळकर ह्या कार्यक्रमाची संचालक सुत्र आमच्या हाती सोपविल्या बद्दल मी वनश्री सरांचे आभार मानते..
आता मी जास्त वेळ न घेता मान्यवर मंडळींच आगमन झालेलं आहे त्यानाही व्यासपिठावर येण्यासाठी आमंत्रित करत आहे..
भालचंद्र शेठ,पराग चांदिवाले,
आवनी जामखेडकर,निमाईदेवी भाट,याना विनंती करतो की त्यानी स्टेजवर येवून आपले आसन ग्रहन करून आम्हाला कृत कृत करावे
सर्व मान्यवर स्टेजवर जावून आसनास्थ झाले..
तदनंतर डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हर्षाने टाळ्या पिटण्यात नेहमीच अग्रेसर असनारे श्रोतेजन टाळ्यांच्या जल्लोषात गरजले आणि हाँलच पूर्ण बोलू लागल्याची जानीव भिंतीनाही झाली..कारण टाळ्या आणि मुखाणे आरती दीदींचा जय होच्या घोषणा ने
कौतुक सोहळा
भिंतीही डोलू लागल्या होत्या..
नाजूक,सुडौल मराठमोळ्या साडीत खुलून दिसनारं सौदंर्याच्या मालकीन आरती यांच स्टेजवर आगमन झाले होते..टाळ्या वाजत होत्या आरतीचं मन मात्र हा कौतुक सोहळा पाहण्यास निवास मात्र हजर नसल्याने ती आतून दु:खी होती..
त्या बरोबर आज आईबाबा असते तर?
तर लेकीचा खुप मोठा सत्कार होताना त्यानी आपल्याला जन्मदिल्याच सार्थ अभिमान त्यांच्या मुखावर विसावलेला पाहताना तीला अजून गर्व वाटला असता...
परंतू हा सोहळा पाहण्याचे भाग्य आणि त्यांच्यांकडून कौतुक करवून घेण्याचे तीच्याही नशिबी नव्हते...
"""सर्वजन स्टेजवर आरतीच्या कौतुकाचे पुल बांधत होते..प्रत्येकांच्या मुखातून शब्द कौतुकाचे वेगळे असले तरी आशय मात्र एकच आरतीचा सन्मान..
परंतू आरतीची नजर गर्दीत मात्र काहीतरी शोधण्यात मग्न होती..तीला राहून राहून निवासचा प्रेममय चेहरा डोळ्यासमोर येत होता..
तीने मना पासून निवास तू असता तर ?आजचा हा आनंद तुझ्याशिवाय अपूरा आहे..तो द्वगुणीत झाला असता...
आरती आपल्या विचारात मग्न असताना..
एका उमदा तरूण स्टेज वर प्रगट झाला ..आणि संचालन सुत्राने
जाहीर केले..
आत्ताच आरती दीदींच्या पाठी सावली प्रमाणे असणारे श्रीनिवास आपल्यात आत्ताच हजर झालेले आहेत..
देखणा श्रीनिवास सर्वांच्या परीचयाचा होताच.. आणि कनिष्ठ वर्गांवर विषेश माया करणारा होता..
क्रमश: पूढे -

167 

Share


2598
Written by
2598

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad