आजकालच्या स्पर्धात्मक युगात टिकण्याचे आव्हान सगळ्या समोरच आहे,मग क्षेत्र कोणतेही असो जगण्यासाठी स्पर्धा ही आलीच आणि ह्या अशा स्पर्धात्मक युगात एकदा जिंकून स्पर्धा संपली असे नाही उलट ते जिंकणे अबाधित ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे.जिंकणे,पुढे जाणे,चालत राहणे,यशाची सवय होणे काही म्हणा पण संध्या माणूस म्हणून पृथ्वीतलावर अस्तित्व टिकवण्यासाठी हे सारे अत्यंत गरजेचं आहे.
संपुर्ण आयुष्यात प्रत्येकाच्या वाटेत चार अवस्था येतातच बालपण, तारुण्य,प्रोढत्व आणि म्हातारपण या चार पैकी बालपण आणि तारुण्य ज्ञानार्जन आणि स्वतःला घडवण्यासाठी आणि मोठी मोठी स्वप्ने उराशी बाळगत उंच उंच भरारी घेण्यासाठी असतात,