Bluepad | Bluepad
Bluepad
साडी
shalini chavan Boudhe
shalini chavan Boudhe
15th May, 2022

Share

"साडी"
प्रत्येक स्त्रिचा अगदी जिव्हाळयाचा विषय. साधारणतः भारतीय संस्कृतीतिल स्त्रियांच्या आयुष्यातिल प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही साडी नी होतांना दिसून येतं.
पहिल्यांदा जेव्हा ती कधी शाळेत "टीचर्स डे " च्या दिवशी आईची असलेल्या साडयांपैकी सर्वात छाण साडी नेसून मोठ्या आनंदानी जगातील सर्वात सुन्दर मीच या अविर्भावानी ती मिरवते.
आयुष्यात ते क्षण ती कधीही विसरत नसेल. साडी तील ते नातं ती कीती हळुवार जपत असते नं...असेच पुढील प्रत्येक कारणास्त्व नेसलेली साडी तिच्यासाठी तीच्या आयुष्यात अनेक सुंदर बदल घडवून आननारेच असतात.
आई नसेल तिंला आईची साडी बघुन आईंच्या सर्व आठवणी त्याज्या होतात..
कधीही नं विसरणाऱ्या.परत त्या ती लॉकर मधिल हीरेजवारात जपाव्या तश्या त्या साड्या नव्हे भावना जपत असते.
इतरांना त्या जुन्या साड्याच दिसत असतात,पण तिच्यासाठी त्या अनमोल ठेवाच असतात..
साडयांच्या प्रकारातील प्रत्येक प्रकार आपल्या कपाटात असाव्या असा प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि का वाटू नये,तीचा तो अधिकारचं ! हमखास पतींच् म्हणनं असतं "इतक्या साडया असतानी कशाला हवी गं नवी साडी,आहे त्या नेस " पण प्रत्येक प्रसंगाचं नातं ही साडी जपत असते.
त्या साड़ीच्या सोबत तीच्या भावना जुळलेल्या असतात.हे पुरुषांना नसतं कळत.
साड़ी ला जरा खोचा पड़ला जसा तिच्या शरीरावर जखम झाल्यासारखी वेदना तिंला होत असते.
तुम्हाला ही हा लेख वाचतांना तुमच्या अनेक आठवणी नक्कीच आठवत असतील. यात प्रत्येक रंगांच ही मोठं गमतिशीर शास्त्र आहे.
लिहायचं म्हटलं की ख़ुप मोठा लेख होईल, पण मला आज एक गोष्ट हृदयाला चटका लावुन गेली.ती मला मुदाम इथे सांगायचीय.
ती म्हणजे संसाराच्या इतक्या खड़तर प्रवासा नन्तर जेव्हा तीच्या ह्या प्रवासाचा शेवट होतो तेव्हा मात्र ती "माहेरचीच् साडी "नेसुन या जगाला कायमची सोडून जाते..
साडी
.....कवयित्री, लेखिका
.शालिनी चव्हाण बोधे, नागपुर..

110 

Share


shalini chavan Boudhe
Written by
shalini chavan Boudhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad