Bluepad | Bluepad
Bluepad
भावनांचे ओघळ.....
सायली साटविलकर
सायली साटविलकर
15th May, 2022

Share

नमस्कार मंडळी, मी सायली... आज पुन्हा एकदा
नव्याने आणखी एका विषयावर चर्चा करणार आहोत.
मित्रहो, आजचा विषय थोडा गाभीयांचा आहे....
अहो, गंभीर बोलले, महणून लगेच काळजात धसस करू नका हो... relax करा. तर मित्रहो, आज आपण आमच्या
उरण तालुकाबद्दल बोलणार आहोत... या आधी सुद्धा आपण उरण आणि तिथले विद्यार्थी यावर बोलली आहोत. उरणच सौंदर्य, हिरवा डोंगर, निळी किनारपट्टी, कोळी आगरी लोकवस्ती... आहह...
तर आज आपण बोलणार आहोत ते उरणमधील शिव समर्थ स्मारकाबद्दल... तर त्या आधी सुरुवात एका छोटया गोष्टीने करू या....
पण मित्रहो, आजचा विषय जेवढा गंभीर तेवढाच संवेदनशील तर सर्वप्रथम कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही आहे...
चला तर मग सुरुवात करूया...
एक तरुण, आपल्या बाईकर सिग्नलला उभा असतो.
त्याने आपल्या बाईकबर नंबर प्लेट ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असते. त्यावर तो ट्रैफिक पोलिस त्याला अडवतो. तो वरुण त्या ट्रैफिक पोलिसाला हिरवी कडक नोट देऊन निघून जातो.
रात्री त्याच्या स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज येतात, त्याला वाटते राजे आता मला शाबासकी देतील, पण झालं उलट... महाराज त्या तरुणावर नाराज झाले, कारण त्याने आपली शिवभक्ती व्यक्त करण्यासाठी कायद्याचं उल्लंघन केलं. नंतर मग त्या तरुणाला आपल्या कृतीची जाणीव होते आणि नंतर मग पुन्हा कधी असं वागणार नाही म्हणून वचन देतो... मित्रहो ही झाली कथा... आणि आपल्यापैकी खूप जणांना माहित सुद्धा आहे... पण पाहिलत मंडळी, आपल्याकडून महाराजांना नक्की काय अपेक्षित आहे आणि आपण नेमके काय आणि कसे वागत पाहिजे, याच कथन ही छोटीसी गोष्ट करते... ही छोटी कथा खुप काही सांगून जाते....
तर मंडळी, चला तर आता आपल्या विषयाकडे वळूया.... तर मंडळी मी सुरुवातीपासून सांगत आले, ते मुहणजे इथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही आणि टीका ही करायची नाही.... फक्त वास्तव आहे ते मांडावेसे वाटते.....
तर आपण आधी थोडक्यात, शिव समर्थ स्मारकाबद्दल जाणून घेऊ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील रायगड जिल्ह्यातील उरण हे शहर आणि जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई दास्तान फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित शिव-समर्थ स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या असलेल्या पावणेदोन एकर जागेत उभारण्यात आले आहे. सुमारे 30 कोटी खर्चून 22 मीटर उंचीचे हे स्मारक उभे आहे. शिव-समर्थ स्मारकाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी 17 फेब्रुवारी 2019 ला पार पडला. या स्मारकाच्या पुतळ्याचे काम और शिल्पकार दीपक थोपटे यांनी केले आहे. परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन यस्तूंचे मयुझियम, मिनी सॅम्पी थिएटर कॅफेटरिया, फाऊंटन गार्डन आदी सुविधाही उभारण्यात आल्या आहेत.
पण आज जर पहायला गेलं तर अवघ्या एक वर्षात शिव समर्थ गुगारकाला गळती सुरू झाली. या नंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. टीकांचा वर्षाव तर सुरुवातीपासूनच चालू होता. या शिम समर्थ स्मारकासोबत अनेक उरणवासीयांच्या भावना जोडलेल्या आहेत.
आता हे झालं शिव समर्थ स्मारकाबद्दल....
आता उरणबद्दल बोलू, त्या आधी उरण मध्ये काय
काय आहे, ते पाहू या...
उरणमधील मुख्य व्यवसाय मुहणजे मासेमारी; मुंबईतील 80% मत्स्य उत्पादन उरण जिल्ह्यातील मच्छीमार, विशेषतः करंजा आणि मोरा या गावातून होते..
दुसरा मोठा व्यवसाय म्हणजे शेती. रामगड जिल्ह्यातील तांदळाच्या उत्पादनात उरणचे योगदान आहे. भात उत्पादनाच्या बाबतीत रामगड हा दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे.
उरण मध्ये जहाजबांधणी आणि बंदर समर्थन आहे मुख्य आर्थिक घटक आहेत. जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) हे भारतातील सर्वांत मोठे कंटेनर टर्मिनल आहे. उरण तालुक्यातील इतर कंटेनर टर्मिनल्समध्ये एपीएम टर्मिनस (पूर्वी जीटीआय) आणि डीपी वर्ल्ड यांचा समावेश आहे.
भारतीय नौदलाने मोरा जवळ नौदल तळ सांभाळला आहे.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉपोरेशन (ओएनजीसी) आहे.
जीटीपीएस-एमएसईबी हा नैसर्गिक वायूद्वारे चालविला
जाणारा आशिया खंडातील पहिला विद्युत प्रकल्प आहे.
अन्य औद्योगिक आणि उत्पादन नियोक्ते यॅडमेल नॉर्टन
लिमिटेड, एनएडी आहे. पण उरण मध्ये आज ही सुसज्ज असं एखाद
Hospital नाहीय... आजही उरण मध्ये Degree
Level Courses College सोडलं तर Engineering College nchi... जुयाची खरच गरज जनसामान्यांना आहे.
जेव्हा है शिव समर्थ स्मारक उभारण्याची घोषण झाली तेव्हा सर्व टीकाकारांच मत स्मारक बांधण्याऐवजी त्याच खर्चात एखादं सुसज्ज असं Hospital बांधाये अशी मागणी होती. अर्थात भविष्यात या सुमारकामुळे उरणची ओळख आणखी वेगळी बनली असती. आणि पर्यटनाच्या दृष्टीने याचा उपयोग उरणच्या जनतेलाच होणार आहे. मंडळी, आपल्याला शाळा, कॉलेजमध्ये सर ( Teacher) कामाच्या व्यवस्थापनासाठी एक नियम सांगायचे, आठवत का कोणाला?
मला माहीतच होते... तुम्हाला नसेल आठवत... ठीक आहे मीच सांगते....तर मंडळी जी काम आपल्याला करायची आहे त्याचे 4 भाग बनवायचे पहिल्या भागात
अत्यंत महत्त्वाचं आणि ज्याची गरज आहे. दुसऱ्या भागात कमी महत्त्वाचे पण ज्याची जास्त गरज आहे.
तिसऱ्या भागात महत्वाचे पण थोड्या कमी गरजेच
आणि चौथ्या भागात कमी महत्त्वाचं आणि कमी गरजेचं काम येत.
उरण आर्थिकदृष्ट्या सक्षम असला तरी आजही उपचार, शिक्षण या करिता उरणवासियांना उरण बाहेर जावं लागतं... काही criticct condition मध्ये रुग्ण उपचारासाठी उरण बाहेर जाताना. अर्ध्या रस्त्यामध्ये प्राण गमवतो. ही वास्तविकता आहे....
मित्र हो, आपल्या उरणसाठी शिवसमर्थ सुमारक • आणि Hospital या दोन्ही महत्त्वाचे आहेत. पण जनहितासाठी Höspital जास्त गरजेच आहे नाही का..?
तर मंडळी चला तर... आज इथेच थाबू पण जाता जाता,
रामदास स्वामींची ओवी आठवली....
अवगुण त्यागवया कारणे,
न्यायनिहुर लागे बोलणे,
तरी श्रोती कोप न धरणे,
ऐसिया वचनाचा..."
अर्थात मंडळी ओविप्रमाणे कोणाच्याही भावना न दुखवण्याचा हेतू होता, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर श्रोते क्षमा असावी....
Sayali Satvilkar ©

189 

Share


सायली साटविलकर
Written by
सायली साटविलकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad