शांतपणे तुझ्या खांद्यावर
डोके ठेवून मी निजावे,
जीवनात सुखद आनंदाचे
क्षण तुझ्या मिठीत लाभावे...!
आपल्या प्रेमाच्या बागेत
फुलांची सुगंध दरवळावी,
प्रीतीच्या मनोमिलनात
मिठीत हिरवळ पसरावी..!
तुझ्या स्पर्शाची वेल
माझ्या मनास बिलगते,
रेश्मी मखमली मिठीत
तनू माझी शहारते..!
यौवनात धुंदी चढली प्रेमाची
एकमेकांच्या घट्ट बंधनात,
ह्र्दयाला ह्रदय भिडले
अन् श्वास गुंतला श्वासात...!
सावरावे कितीदा मनाला
आकंठ बुडाले मी तुझ्यात,
रोमांच उठे हळुवार देहात
ह्र्दयाची स्पंदने वाढली माझ्यात...!
.....✍️ कवयित्री अनुश्री
अनिता आबनावे ©®